मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Redmiच्या 'या' SmartPhoneचा स्फोट; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Redmiच्या 'या' SmartPhoneचा स्फोट; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

रेडमी फोनचा स्फोट झाला ज्यामुळे डिव्हाइस पूर्णपणे जळालं. घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

रेडमी फोनचा स्फोट झाला ज्यामुळे डिव्हाइस पूर्णपणे जळालं. घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

रेडमी फोनचा स्फोट झाला ज्यामुळे डिव्हाइस पूर्णपणे जळालं. घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 सप्टेंबर :  अलीकडच्या काळात सर्वच गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे साहजिकच स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. एकीकडे स्मार्टफोनचा वापर वाढत असताना दुसरीकडे काही घटनांमुळे त्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. स्मार्टफोनचा स्फोट होण्याच्या घटना आपण ऐकतो, वाचतो. सध्या चीनमधली अशीच घटना चर्चेचा विषय ठरली आहे. रेडमी नोट 11 टी प्रो  या हॅंडसेटचा स्फोट झाला आणि त्यामुळे हॅंडसेट पूर्णपणे जळून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर  एका व्यक्तीनं शेअर केला असून, तो व्हायरल होत आहे. मात्र हा स्फोट कसा झाला याविषयीची अधिक माहिती या व्हिडिओत देण्यात आलेली नाही. तसंच या घटनेवर रेडमी उत्पादक कंपनी शाओमीनं अधिकृत निवेदन दिलेलं नाही. त्यामुळे या स्फोटाचं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. `झी न्यूज हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे.

स्मार्टफोन हा जीवनातला अविभाज्य भाग बनला आहे. मात्र एखादी छोटी चूक किंवा फोनमधला दोष मोठ्या घटनेसाठी कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येतं. चीनमध्ये रेडमी नोट 11 टी प्रोचा स्फोट झाला, ज्यामुळे डिव्हाइस पूर्णपणे जळालं आहे. ही पोस्ट पीयूष भास्कर (@TechKard) नावाच्या यूजरनं शेअर केली. ही पोस्ट त्याने टिकटॉकवरून ट्विटरवर शेअर केली आहे. व्हिडिओत रेडमी नोट 11 टी प्रो डिव्हाइस दाखवण्यात आलं असून, ते पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आहे. तसंच फोनचा फ्रंट डिस्प्ले तुटलेला आहे. युजरने व्हिडिओत स्मार्टफोनच्या स्फोटाविषयी अधिक माहिती दिलेली नाही. तसंच शाओमी कंपनीकडूनही यावर अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

हेही वाचा - 7 सेकंदात रॉकेट होईल KTM ची कार! या किंमतीला झाली लॉन्च

रेडमी नोट 11 टी प्रो हा स्मार्टफोन मार्च 2022 मध्ये लॉंच करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.6 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्शन 8100 चिपसेट असून, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आलं आहे. फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मायक्रोसेन्सर लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या पुढच्या बाजूला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. तसंच यात 67W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5080 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

परंतु, या स्मार्टफोनचा स्फोट होऊन तो पूर्णतः जळाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट 13 सप्टेंबरला शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला आतापर्यंत 95 लाइक आणि 30 रिट्विट मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये हा फोन पूर्णपणे जळाल्याचं दिसतं. कॅमेरा पूर्णपणे खराब झाला असून मागील पॅनेल वितळले आहेत. डिस्प्ले खराब झाला असून तो तुटला आहे. या व्हिडिओ घटनेविषयी सविस्तर स्पष्टीकरण नसलं तरी बॅटरीचा स्फोट होऊ शकतो, असं यात दिसतं.

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. एका युट्यूबरनं ही घटना उजेडात आणली होती. दिल्ली एनसीआर भागात एका रेडमी 6A डिव्हाइच्या बॅटरीचा स्फोट झाला होता. या घटनेत या युट्यूबरच्या काकूचा मृत्यू झाला होता. शाओमीनं ट्विट करत यावर उत्तर दिलं होतं. तसंच पीडित कुटुंबापर्यंत पोहोचून प्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं कंपनीनं म्हटलं होतं.

First published:

Tags: Video viral