मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दुकानदार विकतोय मिरचीचं ICE CREAM, ‘वाह’ऐवजी म्हणाल ‘हाsssss’; पाहा VIDEO

दुकानदार विकतोय मिरचीचं ICE CREAM, ‘वाह’ऐवजी म्हणाल ‘हाsssss’; पाहा VIDEO

वेगवेगळ्या प्रकारची आईस्क्रीम लोकप्रिय असताना आता मिरचीच्या आईस्क्रीमची जोरदार चर्चा रंगली आहे. खाल्ल्यावर मजा येणारं पण जोरदार झटका बसणारं हे आईस्क्रीम चर्चेचा विषय ठरत आहे.

वेगवेगळ्या प्रकारची आईस्क्रीम लोकप्रिय असताना आता मिरचीच्या आईस्क्रीमची जोरदार चर्चा रंगली आहे. खाल्ल्यावर मजा येणारं पण जोरदार झटका बसणारं हे आईस्क्रीम चर्चेचा विषय ठरत आहे.

वेगवेगळ्या प्रकारची आईस्क्रीम लोकप्रिय असताना आता मिरचीच्या आईस्क्रीमची जोरदार चर्चा रंगली आहे. खाल्ल्यावर मजा येणारं पण जोरदार झटका बसणारं हे आईस्क्रीम चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Published by:  desk news
नवी दिल्ली, 5 डिसेंबर: सोशल मीडियावर सध्या (Chilly Ice cream) मिर्चीचं आईस्क्रीम जोरदार व्हायरल होत असल्याचं दिसत आहे. आईस्क्रीम हा जवळपास प्रत्येकाचा विक (Ice cream weak point) पॉईंट असतो. आईस्क्रीम आवडत नाही, अशी व्यक्ती सापडणं फारच अवघड असतं. प्रत्येकाचा आवडणारा फ्लेवर आणि प्रकार (Flavor and style of ice cream) वेगवेगळा असतो. प्रत्येक दुकानातही वेगवेगळ्या पदधतीचं आणि स्टाईलचं आईस्क्रीम बनवलं जातं. काही ब्रँड्स हे फळांचे आईस्क्रीम बनवण्यासाठी (Fruit ice cream) प्रसिद्ध असतात, तर काहीजण फळ सोडून इतर फ्लेवर अधिक चांगलाच तयार करतात. मात्र सध्या मिरचीपासून तयार केल्या जाणाऱ्या आईस्क्रीमची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. वेगवेगळ्या प्रकारची आईस्क्रीम लोकप्रिय असताना आता मिरचीच्या आईस्क्रीमची जोरदार चर्चा रंगली आहे. खाल्ल्यावर मजा येणारं पण जोरदार झटका बसणारं हे आईस्क्रीम चर्चेचा विषय ठरत आहे.वेगवेगळ्या प्रकारची आईस्क्रीम लोकप्रिय असताना आता मिरचीच्या आईस्क्रीमची जोरदार चर्चा रंगली आहे. खाल्ल्यावर मजा येणारं पण जोरदार झटका बसणारं हे आईस्क्रीम चर्चेचा विषय ठरत आहे. असं होतं मिरचीचं आईस्क्रीम मिरचीचं आईस्क्रीम कसं तयार करायचं, याची रेसिपी सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आईस्क्रीम तयार करणाऱ्यानं सुरुवातीला मिरचीचे काही तुकडे घेतले. त्यावर मग न्यूट्रेला टाकला. त्यानंतर क्रीम मिल्क टाकून सर्व मिश्रण एकत्र क्रश करून घेतलं. त्यानंतर फ्रीजरवर आईस्क्रीमला चांगल्या तऱ्हेनं क्रश करून त्याचा रोल तयार करण्यात आला. अशा प्रकारचे छोटे छोटे रोल त्याने तयार केले आणि एका प्लेटमधून सर्व्ह केले. त्यावर काहीसं सीरप आणि मिरचीचे टॉपिंग्ज टाकून ते सर्व्ह करण्यात आले. झन्नाट मिरची आईस्क्रीम रोल या आईस्क्रीमला झन्नाट मिरची आईस्क्रीम रोल असं नाव देण्यात आलं आहे. जी व्यक्ती हे आईस्क्रीम खाईल, तिला जोरदार झटका बसेल आणि आईस्क्रीम खाण्याचा आनंदही लुटता येईल, असं शेफ सांगतो. आतापर्यंत अनेक प्रकारची आणि फ्लेवरची आईस्क्रीम पाहिली होती, मात्र मिरचीपासून तयार केलेलं हे आईस्क्रीम अनोखं असल्यामुळे त्याला युजर्सची जोरदार पसंती मिळत आहे. हे वाचा- भयंकर! पत्नीला कुरूप बनवण्यासाठी नवरेच करतात हे विचित्र काम, वाचूनच व्हाल सुन्न व्हिडिओ झाला व्हायरल हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून युजर्सनी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता मिरचीचं हेच होणं बाकी होतं, असं एकानं म्हटलं आहे. तर मिरचीपासून काय करावं, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक यंत्रणा उभी करायला हवी, अशी प्रतिक्रिया दुसऱ्यानं दिली आहे.
First published:

Tags: Delhi, Recipie, Video viral

पुढील बातम्या