मुंबई, 21 फेब्रुवारी : एखादी गोष्ट जितकी चित्रविचित्र असेल तितकी ती इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर (social media) लवकर व्हायरल (viral) होते असं आपण नेहमीच पाहतो. आता अशीच एक चित्रविचित्र गोष्ट समोर आली आहे. ही गोष्ट आहे एका अनोख्या रेसिपीची(recipe).
पाकिस्तानातील एका व्यक्तीनं (Pakistani person) चक्क स्ट्रॉबेरी बिर्याणी (strawberry biryani) तयार केली आहे. त्यानं तिला नाव दिलं आहे 'स्ट्रॉबिर्याणी'. (strawbiryani) या व्यक्तीची ही रेसिपी इंटरनेटवर वेगानं व्हायरल झाली.
भारत असो की पाकिस्तान, बिर्याणी दोन्हीकडं सारखीच लोकप्रिय आहे. भारतात तर विविध प्रांतांमध्ये विविध प्रकारे बिर्याणी बनवली जाते. आता मात्र चक्क स्ट्रॉबेरीपासून बनलेली बिर्याणी समोर आल्याने नेटकरी बुचकळ्यात पडले आहेत.
पाकिस्तानातल्या एका व्यक्तीची ही अनोखी रेसिपी आहे. यात बिर्याणीत चक्क लालचुटूक स्ट्रॉबेरी टाकलेल्या दिसतात. ही बिर्याणी बनवल्यावर या व्यक्तीनं ट्विटरवर (twitter) शेअर करत लिहिलं, 'आज आम्ही घरी स्ट्रॉबिर्याणी बनवली आहे. देसी ट्विटरला याबाबत काय वाटतं हे जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता आहे.'
We made “Strawbiryani” at home today and I am curious to know what desi Twitter has to say about it. pic.twitter.com/PCZ0Ug38gc
— Saad 🍓 (@SaadGH) February 19, 2021
या फोटोत चिकन किंवा मटनसोबत शिजलेले रंगीत तांदूळ दिसतात. इथवर सगळं ठीक आहे. मात्र त्यावर स्ट्रॉबेरीची पखरण केलेली दिसते. ते पाहून लोकांनी या युजरची चांगलीच मजा घेतली.
हेही वाचाहा VIDEO एकदा पाहून मन भरणार नाही; मुलीचा अनोखा स्टंट पाहून IPS अधिकारीही अचंबित
ही रेसिपी पाहताक्षणीच लोकांनी अनेक गंमतीदार कमेंट्स करून धमाल उडवून दिली. बर्गर आईस्क्रीम (burger ice cream) आणि अननस पिज्जा अशा कॉन्ट्रास्ट रेसिपीजसोबत लगेच लोकांनी या बिर्याणीची तुलना केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan, Twitter, Viral photo