नवी दिल्ली, 21 जानेवारी: एका कॅमेऱ्यात (Camera) 3 चेहरे असलेला (3 faced dog) कुत्रा कैद झाला आहे. या कुत्र्याकडे पाहून अनेकांना आश्चर्य (Surprise) वाटत आहे. वास्तविक, सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला अनेक प्रकारचा कंटेंट बघायला मिळतो. काही फोटो विस्मयकारक असतात, काही मजेशीर असतात तर काही फारच गंभीर असतात. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो सोशल मीडियावर टाकून लोक लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातही अनेकजण असे काही विचित्र फोटो शेअर करतात की ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत राहतं. कुत्र्याला आहेत तीन तोंडंया फोटोत दिसणाऱ्या कुत्र्याला तीन तोंडं आहेत. कदाचित या कुत्र्यामध्ये काहीतरी वैगुण्य असेल किंवा जन्मण्यापूर्वी आईच्या पोटात असतानाच काहीतरी घडलं असेल, त्यामुळे हा कुत्रा असाच जन्माला आला असावा, असं हा फोटो पाहिल्या पाहिल्या कुणालाही वाटू शकतं. मात्र प्रत्यक्षात तसं नाहीय. हा आहे कॅमेऱ्याचा चमत्कार.मोबाईल कॅमेऱ्यातील नवे फिचरसध्या कॅमेऱ्यात अनेक प्रकारचे फिचर्स उपलब्ध होतात. त्यामध्ये तऱ्हेतऱ्हेचे फोटो काढता येतात. या फोटोंना वेगवेगळे इफेक्टही देता येतात. त्यातील पॅनोरमा इफेक्टला अधिक मॉडिफाय करून हा इफेक्ट देण्यात येत असल्याचं दिसून आलं आहे. हा फोटो काढताना कुत्रा आपली मान डावीकडून उजवीकडे फिरवतो. त्यानंतर पॅनोरमा इफेक्टवर घेतलेला हा फोटो सेव्ह होतो आणि त्याची तीन तोंड कॅमेऱ्यात कैद होतात. पहिल्यांदा डावीकडे तोंड असतानाचा एक फोटो, मग समोर पाहतानाचा दुसरा फोटो आणि डावीकडे पाहत असतानाचा तिसरा फोटो कॅमेऱ्यात टिपला जातो आणि हे तिन्ही इफेक्ट्स एकाच फोटोत मर्ज होतात. त्यामुळे तीन तोंडाचा कुत्रा असल्याचा भास हा फोटो पाहून होतो.
हे वाचा -
लोकांना आलं हसूसुरुवातीला हा फोटो जेव्हा लोकांनी पाहिला, तेव्हा अनेक तर्कवितर्क लावले. काहींना ते व्यंग वाटलं, काहींना दैवी वरदानही वाटलं. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच नसून हा केवळ कॅमेऱ्याचा चमत्कार असल्याचं समजलं, तेव्हा सर्वांनाच हसू आलं.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.