OMG: …म्हणून तिनी 15 वर्षं कापले नाहीत केस, बॉयफ्रेंडनी काढलेले फोटो होतायत VIRAL

OMG: …म्हणून तिनी 15 वर्षं कापले नाहीत केस, बॉयफ्रेंडनी काढलेले फोटो होतायत VIRAL

16 वर्षांची झाल्यावर स्टेफनीने केस वाढवायला सुरुवात केली आणि गेल्या 15 वर्षांत तिचे केस तिच्या टाचेपर्यंत पोहोचले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : जगा वेगळं काही करायची प्रत्येकालाच अनामिक इच्छा असते. त्यामुळे अनेक जण विक्रम नोंदवतात किंवा काही अजब करतात. जर्मनीतली सिक्युरिटी गार्ड स्टेफनी क्लासेन हिनीही असंच काहीसं केलंय. तिच्या बॉयफ्रेंडने इन्स्टाग्रमावर शेअर केलेले तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

स्टेफनीने गेल्या 15 वर्षांपासून डोक्यावरचे केस कापलेले नाहीत. लांबसडक केस ठेवण्यामागे तिचं काय कारण आहे हे जाणून घेतलंत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. जर्मन परीकथांमधील परी रॅपुंझेल हिच्यासारखे मोठे केस करण्याची तिची इच्छा आहे. तिला रियल लाइफ रॅपुंझेल बनायचंय. स्टेपनी 31 वर्षांची असून 5 फूट 8 इंच या तिच्या उंचीहून तिचे केस दोन इंच लांब आहेत. तिचा बॉयफ्रेंड राफ कोपिट्ज याने स्टेफनीच्या या 15 वर्षांच्या प्रवासातील फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिला आपले केस 2 मीटर लांब करायचे आहेत. राफ आयटी टेक्निशियन असून तो 2016 मध्ये पहिल्यांदा स्टेफनीला भेटला. त्याचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्याला स्टेफनीचं तिच्या केसांवर खूप प्रेम असल्याचं लक्षात आलं. त्यानी तिच्या केसांचे वेगवेगळ्या पद्धतीने फोटो काढायला सुरुवात केली. ते फोटो स्टेफनी(@loreleys_hairdream) या तिच्या इन्स्टाग्राम पानावर टाकत असते. तिचे 2100 हून अधिक फॉलोअर्स आहेत. ती म्हणाली, ‘मला कायमच मोठे केस ठेवायचं होते पण माझ्या पालकांना केसांची निगा राखणं नको होतं म्हणून ते मला खांद्यांपर्यंत केस वाढवायला सांगायचे.’

16 वर्षांची झाल्यावर स्टेफनीने केस वाढवायला सुरुवात केली आणि गेल्या 15 वर्षांत तिचे केस तिच्या टाचेपर्यंत पोहोचले आहेत. तिनी सांगितलं की ती बॉयफ्रेंडला केसांचे फोटो काढायला सांगते. ती म्हणाली, ‘ मी काहीतरी कल्पना लढवते आणि राफ ती प्रत्यक्षात उतरवून वेगवेगळ्या अँगलनी माझ्या केसांचे फोटो काढतो. मला अजून केस वाढवायचे आहेत. ’ स्टेफनी मोठ्या केसांमुळे कार्टुन कॅरॅक्टर रॅपुंझेलसारखी प्रत्यक्ष दिसायला लागली आहे.

स्टेफनी आठवड्यातून दोनदा केस धुते पण ते वाळवायला तिला खूप त्रास होतो. ती नियमितपण शॅम्पू आणि कंडिशनरनेच केस धुते. कधीकधी ती केस ओले ठेऊनच झोपेत उठल्यावर केस वाळलेले असतात. केस खराब होतात म्हणून केस वाळवण्यासाठी हेअर ड्रायर वापरत नाही असं तिनी सांगितलंय.

Real Life Rapunzel 1 स्टेफनीने गेल्या 15 वर्षांत केस कापलेले नाहीत. ते 2 मीटर लांबीपर्यंत तिला वाढवायचे आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 24, 2020, 9:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या