Home /News /viral /

रोहित शेट्टीच्या चित्रपटांतील Real Action; अपघाताचा VIDEO पाहून धक्काच बसेल

रोहित शेट्टीच्या चित्रपटांतील Real Action; अपघाताचा VIDEO पाहून धक्काच बसेल

वाढत्या थंडीचा असा परिणाम....

    कुल्लू, 29 नोव्हेंबर : आतापर्यंत तुम्ही रस्ते अपघाताचे (Road Accident) अनेक व्हिडीओ पाहिले असतील. काही अपघात हे मानवाने केलेल्या चुकीमुळे असतात. यात अनेकांचा जीवही जातो. हिमाचल प्रदेशमधून (Himachal Pradesh) एक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे थंडी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी जमा होऊ लागलं आहे. अशात अनेक वाहनं घसरण्याच्या घटना समोर येत आहे. कुल्लू जिल्ह्यातील डोभीजवळ रविवारी एक कार घसरली. कार एका बाजूने उचलली गेल्यानंतर दुसऱ्या बाजूचा भाग दरवाज्यावर उभा राहिला आणि सरकत जलद गतीने पुढे निघून गेली. ही गाडी जाताना एक व्यक्ती रस्ता क्रॉस करीत होता. दरम्यान दैव बलवत्तर म्हणून ती व्यक्ती बचावली. दरम्यान बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध दिगदर्शक रोहीत शेट्टी यांच्या चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे अपघात पाहायला मिळतात. येथे तर खरखुरा स्टंट पाहायला मिळाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Accident, Himachal pradesh, Shocking viral video

    पुढील बातम्या