नवी दिल्ली(अम्बुज शुक्ला), 02 एप्रिल : शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांच्या गोष्टी आपल्याला नेहमी प्रेरणादायी असतात. दरम्यान एका शेतकरी कुटुंबातील पोराने जर क्रांती केली असेल तर याची देशभरात चर्चा होत असते. अशीच एक गोष्ट आपण पाहणार आहोत. शेतकरी कुटुंबातील 69 वर्षीय रवी पिल्लई यांच्याविषयी आपल्याला माहिती नसेल. या शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याची संपत्ती 3.5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
रवी पिल्लई हे आरपी ग्रुपचे संस्थापक आहेत. महाविद्यालयीन काळात त्यांनी पहिला व्यवसाय सुरू केला आणि नंतर कधीही मागे वळून पाहिले नाही, बांधकाम व्यवसायात प्रवेश केला. सध्या, त्यांची कतार, बहरीन आणि UAE च्या इतर भागात कार्यालये आहेत. त्याच्याकडे लक्झरी वाहनांचा ताफा देखील आहे.
कधीच मेकअप का नाही करत साई पल्लवी? साऊथ सुंदरीने सांगितलं खरं कारण
Rolls Royce Ghost हे लक्झरी कार ही त्यांनी घेतलेल्या वाहनांपैकी सर्वात स्वस्त वाहन समजले जाते. त्यांनी ही कार 2011 मध्ये खरेदी केली होती, ते आजही कार वापरतात. 12 वर्षे जुनी असूनही, या अलिशान कारमध्ये सर्व आधुनिक सुविधा आहेत. बाजारपेठेतील सर्वोत्तम सुसज्ज वाहनांपैकी एक आहे. केरळमधील कोल्लम येथील अलीशान कारला त्यांनी या वाहनाला पार्क केले आहे. विशेष आणि महत्वाच्या कामांसाठी ती या कारचा वापर करतात.
मर्सिडीज-मेबॅक हे बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात आलिशान वाहनांपैकी एक आहे. देशाच्या दक्षिण भागात मर्सिडीज-मेबॅक एस 600 ची डिलिव्हरी घेणारे रवी पिल्लई हे पहिले व्यक्ती होते. रोल्स रॉयस व्यतिरिक्त ते ही कार नियमितपणे वापरतात. Maybach S 600 हा मॉडेलचा सर्वात सुसज्ज प्रकार आहे, ज्यामध्ये अनेक आरामदायक आणि हाय-टेक वैशिष्ट्ये आहेत.
त्याच्या गॅरेजमधील इतर सर्व वाहनांच्या तुलनेत, BMW 5-Series ही एक नम्र कार आहे. रवी पिल्लई जी 5-सिरीज चालवतात तो 520d प्रकार आहे, जो बाजारात कारचा सर्वाधिक विकला जाणारा प्रकार आहे. ही मध्यम आकाराची अलिशान कारचा नियमीत वापर करत असतात.
सोन्यानं ओलांडला 60 हजाराचा टप्पा, पाहा नाशिकमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर
लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी ही जगातील सर्वात आलिशान SUV पैकी एक आहे. काळ्या रंगाची ही एसयूव्ही रवी पिल्लई यांच्या मुलीच्या लग्नात आणल्याचे बोलले जाते. ही लक्झरी SUVs पैकी एक आहे आणि अनेक सेलिब्रिटींच्या मालकीची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.