Home /News /viral /

रतन टाटा यांनी आपल्या आवडत्या श्वानाचं नाव ठेवलं 'गोवा', कारण वाचून कराल कौतुक

रतन टाटा यांनी आपल्या आवडत्या श्वानाचं नाव ठेवलं 'गोवा', कारण वाचून कराल कौतुक

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रतन टाटा यांनी आपल्या श्वानाच नावं गोवा का ठेवलं असेल, तर यामागे एक मजेशीर कहाणी आहे.

  नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : भारतातील महान उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना मुक्या प्राण्यांशी विशेष आवड आहे. यामध्ये श्वान हा त्यांचा आवडता प्राणी आहे. त्यांच्याकडे अनेक श्वान आहेत. त्यांच्या एका श्वानचं नाव आहे गोवा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रतन टाटा यांनी आपल्या श्वानाच नावं गोवा का ठेवलं असेल, तर यामागे एक मजेशीर कहाणी आहे. रतन टाटा यांनी स्वतः यामागील गोष्ट सांगितली असून हा श्वान त्यांच्या मुंबईमधील टाटा ग्रुपच्या ग्‍लोबल हेडक्‍वार्टर बॉम्बे हाऊसमध्ये इतर श्वानांसह राहतो. काळ्या रंगाचा हा श्वान रतन टाटा यांचा आवडता आहे. ऑफिसमध्ये गोवाला भेटण्यासाठी ते कायमच उत्सुक असतात. आपला मित्र म्हणून ते त्याला बोलावतात. रतन टाटा यांच्या जवळच्या व्यक्तींना हे नाव ठेवण्यामागील कारण माहीत होतं. मात्र एका फॉलोअरनं टाटा यांना या श्वानाचं नाव गोवा का ठेवलं, असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर टाटा यांनी यामागील कारण सांगितलं. दिवाळीच्या निमित्तानं टाटा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. जिथं ते गोवा आणि इतर काही श्वानांसमवेत दिसत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी दत्तक घेतलेल्या काही श्वानांसोबत काही आनंदाचे क्षण. खासकरून माझा मित्र माझा ऑफिसमधील मित्र गोवा असं लिहिलं होतं. वाचा-अचानक हलायला लागली झाडं; VIRAL VIDEO पाहून व्हाल अवाक
   
   
   
   
  View this post on Instagram
   
   
   
   

  A post shared by Ratan Tata (@ratantata)

  वाचा-कमाल! पठ्ठ्यानं 3 मिनिटं पाण्याच्या टाकीत बंद राहून केल्या 20 मॅजिक ट्रिक्स या ट्विटरवरील फॉलोअरने त्यांना यामागील कारण विचारले असता त्यांनी सांगितले, ज्यावेळी ते गोव्यात माझ्या सहकाऱ्यांच्या कारमध्ये येऊन बसलं ते एक लहानसं भटक्या श्वानाचं पिल्लू होतं, त्यानंतर तो थेट आमच्यासह बॉम्बे हाऊसमध्ये आला. त्याला गोव्याहून आणलं होतं म्हणून त्याचं नाव गोवा. वाचा-असं काय घडलं की बिबट्यानं पाणी पिणं सोडून ठोकली धूम, पाहा VIDEO दरम्यान, प्राणिमात्रांवर प्रेम करणारे टाटा हे कायमच सोशल मीडियावर या संदर्भातील काही फोटो पोस्ट करत असतात. मुळात त्यांना रस्त्यावरील श्वानांवरही तितकाच जीव लावतात. रतन टाटा यांचं श्वानांवर त्यांचं इतकं प्रेम आहे की, टाटा समूहाचं मुख्यालय म्हणजेच बॉम्बे हाऊसचा काही भाग त्यांनी या श्वानांसाठीच राखीव ठेवला आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Ratan tata

  पुढील बातम्या