रसोड़े में कौन था? पोलिसांनी ड्रग डिलरचा फोटो टाकून दिलं व्हायरल मीमला उत्तर

रसोड़े में कौन था? पोलिसांनी ड्रग डिलरचा फोटो टाकून दिलं व्हायरल मीमला उत्तर

आसाम पोलिसांनी राज्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली, त्यानंतर त्यांनी ट्विटरवर अतिशय मजेदार पद्धतीने याबाबत माहिती दिली.

  • Share this:

आसाम, 02 सप्टेंबर : सध्या सोशल मीडियावर तुम्हाला सतत रसोड़े में कौन था? असे प्रश्न विचारणारे मिम्स दिसतील. तर, याचे उत्तर आसाम पोलिसांनी दिले आहे. आसाम पोलिसांनी राज्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली, त्यानंतर त्यांनी ट्विटरवर अतिशय मजेदार पद्धतीने याबाबत माहिती दिली.

इंटरनेटवरील व्हायरल झालेल्या म्यूजिक प्रोड्युसर यशराज मुखाटे यांच्या रसोड़े में कौन था? गाण्याला पोलिसांनी उत्तर दिले आहे.

ट्विटरवर ड्रग पेडलर्सचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'रसोड़े में कौन था? स्वयंपाकघरात दोन ड्रग पेडलर होते. त्यांनी कार्टनमधून Livsaf आणि विटामिन्स काढून त्यात कोडेक्स आणि ड्रग्ज लपवली. टीम नागावने दोघांना पकडलं आहे'.

वाचा-पतंगाला अडकून हवेत उडून गेली 3 वर्षांची चिमुरडी, 100 फूटांवर अशी आली खाली

वाचा-एक नंबर! साडीवरच महिलेने मारला FLIP ; स्टंटच्या VIDEO ने सोशल मीडियावर आग लावली

पोलिसांनी या ट्वीट बरोबरच दोन फोटोही पोस्ट केले आहेत. यात औषधांच्या बाटल्या दिसत आहेत. पोलिसांनी सांगितले की औषधांच्या बाटल्यांमध्ये ड्रग्ज होते. आसाम पोलीस ट्विटरवर मजेदार पोस्ट करून लोकांना हसवत असतात. एवढेच नाही तर संदेश तरुणांपर्यंत पोहोचावेत यासाठी मुंबई पोलीसही अशा मिम्सचा वापर करतात.

Published by: Priyanka Gawde
First published: September 2, 2020, 12:53 PM IST

ताज्या बातम्या