Home /News /viral /

अरेच्चा! पिवळ्या बेडकांनंतर आता दिसलं पिवळं कासव; दुर्मिळ कासवाचा VIDEO

अरेच्चा! पिवळ्या बेडकांनंतर आता दिसलं पिवळं कासव; दुर्मिळ कासवाचा VIDEO

ओडिशामध्ये (odisha) हे दुर्मिळ पिवळं कासव (yellow turtle) दिसून आलं आहे.

    मुंबई, 25 जुलै : काही दिवसांपूर्वीच पिवळ्या बेडकांनी (yellow frog) सोशल मीडियावर (social media) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि या पिवळ्या बेडकांनंतर आता पिवळ्या रंगाचं कासवही (yellow turtle) दिसून आलं आहे. ओडिशाच्या एका गावात पिवळं कासव सापडलं आहे. हे कासव दुर्मिळ असल्याचं सांगितलं जातं आहे. ओडिशाच्या (odisha) बालासोर जिल्ह्यातील  सुजाणपूर गावातल्या स्थानिकांना पिवळ्या रंगाचं कासव दिसलं. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून 196 किलोमीटर दूर हे गाव आहे. स्थानिकांनी या कासवाबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि या कासवाला वनविभागाच्या स्वाधीन केलं आहे. एएनआयशी बोलताना वन्यजीव तज्ज्ञ बी. आचार्य म्हणाले "हे कासव खूप दुर्मिळ आहे. मी आतापर्यंत या ठिकाणी असं कासव पाहिलं नाही" इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुसंता नंदा यांनीदेखील अशा पिवळ्या कासवाचा व्हिडीओ शेअर केला आहे. काही वर्षांपूर्वी सिंधमध्येदेखील असं कासव आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं. हे कासव अल्बिनो (एक प्रकारची त्वचेची समस्या) कासव आहे. त्याचे गुलाबी डोळे अल्बिनिझम असल्याचं दर्शवत आहेत. त्यामुळेच त्याचा रंग पिवळा झालेला असावा असं सुसंता नंदा म्हणाले. हे वाचा - OMG! 14 पायांचं झुरळ; इतकं मोठं झुरळ कधी पाहिलंत का? काही दिवसांपूर्वीच पिवळ्या बेडकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इंडियन फॉरेस्ट अधिकारी परवीन कसवान यांनी या पिवळ्या बेडकांचा व्हिडीओ शेअर केला आहे. मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये एक दोन नव्हे तर भरपूर प्रमाणात पिवळे बेडुक दिसले. हिरव्या रंगाच्या बेडकांऐवजी ही पिवळे बेडुक दिसू लागल्याने नागरिक भयभीत झालेत. आधीच लोक कोरोनाच्या दहशतीत आहे, शिवाय अनेक ठिकाणी टोळधाडीचंही संकट आहे. या दुहेरी संकटात आता असे पिवळी बेडुक म्हणजे हे कोरोना किंवा टोळधाडीशी संबंधित आहे की नवं संकट आहे, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. या पिवळ्या बेडकांचा कोरोना किंवा टोळ यांच्याशी काहीही संबंध नाही, असंदेखील कसवान यांनी स्पष्ट केलं. या बेडकांचा रंग पिवळा का आहे, हेदेखील कसवान यांनी सांगितलं. हे कारण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. हे वाचा -  पावसात नाचू लागले हिरवे नाही तर पिवळे बेडुक; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO लहानपणापासूनच आपल्याला प्राणी, पक्षी यांची ओळख करून दिलेली आहे. आपण तशाच प्रकारे या प्राणी-पक्ष्यांना पाहत आलो आहोत आणि या प्राणी-पक्ष्यांमध्ये थोडा बदल दिसला की त्याचं आश्चर्य वाटतंच, तितकीच त्यांच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता वाढते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Turtule

    पुढील बातम्या