Home /News /viral /

ही आयाळ आणि ही स्टाइल पाहून तुम्हीही पडाल प्रेमात! सोशल मीडियावर या महाशयांचे PHOTO सर्वाधिक व्हायरल

ही आयाळ आणि ही स्टाइल पाहून तुम्हीही पडाल प्रेमात! सोशल मीडियावर या महाशयांचे PHOTO सर्वाधिक व्हायरल

सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल झालेले हे फोटो पाहा.

  प्रिटोरिया, 03 डिसेंबर :  जंगलाचा राजा सिंह हा एक असा प्राणी आहे की त्याला पाहिल्यावरच मनात जरब बसते. सिंहाला मानेभोवती आयाळ असते. त्यामुळे तो वेगळा उठून दिसतो. अशी मोठी आयाळ आणि भव्य पोझमुळे मोया या नावाचा पांढरा सिंह (white lion) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) ग्लेन गॅरीफ कंझर्वेशन लायन सँच्युरीतील (Glen Garriff Conservation lion sanctuary) हा सिंह सध्या खूपच व्हायरल होताना दिसत आहे. या पांढऱ्या सिंहाची आयाळ इतकी लांब आणि दाट आहे की ती पाहून केसाच्या तेलांच्या जाहिरातीतील मॉडेलही लाजतील. सहा वर्षाच्या या सिंहाचे फोटो ब्रिटिश फोटोग्राफर सायमन नीडहॅम यांनी  आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. मेट्रोच्या (Metro)वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार जेव्हा मोयाला (Moya) पहिल्यांदा त्यांनी पाहिलं तेव्हा तो जबरदस्त आकर्षक दिसला. नीडहॅम त्याचे हे आकर्षक रूप पाहून आश्चर्यचकित झाले. याबद्दल बोलताना ते म्हणाले त्याच्याशी जवळीक साधणे अधिकच कठीण होते. परंतु जेव्हा जेव्हा तो माझ्या जवळून चालत होता. तेव्हा मला त्याचे अधिकच सुंदर फोटो घेण्याची संधी मिळाली. मला त्याचे खूप छान फोटो काढता आले. तसेच ते म्हणाले जेव्हा कुठलाही फोटोग्राफर अशा फोटोंवर काम करत असतो तेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी ते सौंदर्य पाहण्याची संधी फार कमीच मिळते. कारण त्या क्षणी त्या प्राण्याचे सुंदर फोटोज काढणे अधिक महत्त्वाचं असतं.
  पांढरे सिंह जंगलात दुर्मिळ आहेत त्यापैकी आता मोया ही जात दिसून आली आहे. पांढऱ्या व्यतिरिक्त साध्या जातीचा सिंह लगेचच आढळून येतो. परंतु पांढरे सिंह सहसा आढळून येत नाहीत. त्याच वेळी पांढरा सिंह आढळून आल्यामुळे त्यांचे फोटो आता अधिकच व्हायरल होत आहेत. निडहॅम यांच्या म्हणण्यानुसार त्यांना अभयारण्याचे संचालक सूजन स्कॉट यांनी मार्गदर्शन केले. कारण त्यांना या सिंहाचे अधिक चांगले फोटो हवे होते व त्यांचे असे म्हणणे होते की  हे छायाचित्र केवळ अभयारण्या बद्दल नव्हे तर जंगलातील सिंहाची दुर्दशा दाखवून त्याबद्दल जागृती वाढवू शकतात.तसेच त्यांचे म्हणणे आहे की ह्या अशा मोहिमा अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण या जगात अनेक सुंदर प्राणी अस्तित्वात आहेत व त्यांची फोटोज जगासमोर येणे महत्त्वाचे आहे. तसेच ते म्हणाले की या बाबतीत मला जर माझे काही लहानसे योगदान देता आले तर याचा मला फारच अभिमान आहे. Whitelions.org या वेबसाइटच्या मते सुमारे 300 सिंह बाकी आहेत. तसेच पांढऱ्या त्वचेचे हे सिंह विशेषत दक्षिण आफ्रिकेत आढळून येतात. त्यांना ल्यूसिझम(Leucism) असे म्हणतात.  हा एक अल्बिनिझमचा(Albinism) प्रकार आहे.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: South africa

  पुढील बातम्या