मराठी बातम्या /बातम्या /Viral /अबब! सुपरमॅन कॉमिकची रेकॉर्डब्रेक कमाई, ऑनलाईन लिलावात मिळाली तब्बल एवढी रक्कम

अबब! सुपरमॅन कॉमिकची रेकॉर्डब्रेक कमाई, ऑनलाईन लिलावात मिळाली तब्बल एवढी रक्कम

सध्याच्या काळात चिकार कॉमिक्स निघत असली, तरी मुलांचा त्याकडचा ओढा कमी झाल्याचं चित्र आपल्याला आजूबाजूला दिसतंच. म्हणूनच जुन्या काळच्या कॉमिक्सना जणू काही सोन्याचे भाव आले आहेत.'जुनं ते सोनं'ही म्हण अगदी तंतोतंत खरी वाटावी, असंच सुपरमॅनच्या (Superman)जुन्या कॉमिक्सच्या बाबतीत झालं आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई, 8 एप्रिल : पूर्वीच्या काळी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी (Entertainment) कॉमिक्स (Comics)हा खूप मोठा आधार होता. तंत्रज्ञानाची प्रगती झालेली नसल्यामुळे टीव्ही, इंटरनेट वगैरे गोष्टींशी मुलांचा संबंध असण्याचा प्रश्नच नव्हता. नंतर टीव्ही आल्यानंतर हळूहळू कार्टून्स (Cartoons)वगैरे पाहायला मिळायला लागली. तेव्हा कॉमिक्समधलेच काही हिरो (Superhero)त्या रूपातही पाहायला मिळू लागले. सध्याच्या काळातही चिकार कॉमिक्स निघत असली, तरी मुलांचा त्याकडचा ओढा कमी झाल्याचं चित्र आपल्याला आजूबाजूला दिसतंच. म्हणूनच जुन्या काळच्या कॉमिक्सना जणू काही सोन्याचे भाव आले आहेत.'जुनं ते सोनं'ही म्हण अगदी तंतोतंत खरी वाटावी,असंच सुपरमॅनच्या (Superman)जुन्या कॉमिक्सच्या बाबतीत झालं आहे.

  एखादं कॉमिक्स साधारण किती किमतीला विकलं जाऊ शकतं?काही अंदाज?24 कोटी रुपये असं या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला पटेल का?नाही ना! पण पटलं नाही तरी ते खरं आहे. comicconnect.com या ऑनलाइन लिलाव (Online Auction)करणाऱ्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,सुपरमॅन हे पात्र लोकांसमोर आणणाऱ्या कॉमिक्सच्या काही प्रतींची 32.5 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 24 कोटी रुपयांना विक्री झाली आहे.

  2014मध्येही या कॉमिक्सची अशीच मोठ्या किमतीला विक्री झाली होती. तेव्हा 32 लाख डॉलर रुपये त्या कॉमिक्ससाठी मिळाले होते. comicconnect.com चे सीओओ व्हिन्सेंट झर्झोलो (Vincent Zurzolo)यांनी दिलेल्या माहितीनुसार ते कॉमिक्स 1938मध्ये प्रकाशित झालं होतं. एक प्रकारे तिथपासूनच सुपरमॅनची सुरुवात झाली होती.

  या मासिकाची विक्री करणाऱ्या व्यक्तीलाही या व्यवहारात मोठा फायदा झाल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. त्या विक्रेत्याने 2018मध्ये ते कॉमिक खरेदी केलं होतं. आता ते विकताना त्याला एक लाख डॉलरहून अधिक फायदा झाला आहे. झर्झोलो यांनी सांगितलं, की जेव्हा हे कॉमिक्स पहिल्यांदा प्रकाशित झालं होतं, तेव्हा ते खूप वाचकांनी विकत घेतलं होतं. आता त्यातल्या केवळ 100 प्रतीच शिल्लक राहिल्या होत्या.

  जुन्या काळातल्या या कॉमिक्सचं वैशिष्ट्य म्हणजे चित्रांतून संपूर्ण गोष्ट डोळ्यांसमोर उभं करण्याचं सामर्थ्य त्यामध्ये होतं. त्या वेळच्या उपलब्ध तंत्रज्ञानाचा विचार करता त्या मानाने खूप चांगल्या पद्धतीने हे विषय मुलांसमोर मांडले जायचे. ते केवळ मुलांपुरतेच मर्यादित न राहता मोठ्या व्यक्तींनाही ते वाचावंसं वाटायचं. कॉमिक्सच्या या लोकप्रियतेचा विचार करूनच नंतरच्या काळात सुपरमॅन वगैरे हिरो कार्टून किंवा चित्रपटांच्या रूपांतून लोकांसमोर मांडले गेले. तो काळ आता गेला असला, तरी अजूनही जुन्या आठवणी लोकांच्या मनात कायम असल्याचंच अशा घटनांतून दिसून येत असतं.

  First published:
  top videos