मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चॅलेंज! हा VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; 'मराठी पोरगी'ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

चॅलेंज! हा VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; 'मराठी पोरगी'ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

नाकात नथ, नऊवारी नेसून स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

नाकात नथ, नऊवारी नेसून स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

नाकात नथ, नऊवारी नेसून स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. एका मराठी मुलगीचा हा व्हिडीओ आहे. नाकात नथ, नऊवारी साडी नेसलेल्या या महाराष्ट्राच्या लेकीने अख्ख्या देशाला वेड लावलं आहे. तिने तिच्या तालावर सर्वांना नाचवलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगात संचारल्याशिवाय राहणार नाही. आता नऊवारी साडी नेसून असं या मुलीने केलं तरी काय, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तिने डान्स केला असावा किंवा एखादा स्टंट केला असावा अशी काहीशी तुम्ही कल्पनाही कराल. पण तुमच्या कल्पनेच्या पलिकडे तिने काही करून दाखवलं आहे. तिने चक्क रॅप केलं आहे. तोसुद्धा 'नववारी'चा एखादं मराठी गाणं, लावणी यात तुम्हाला नऊवारीचा उल्लेख ऐकायला मिळाला असेल. नऊवारीत ठसकेबाज लावणी तुम्ही पाहिली आहे. पण हीच नऊवारी नेसून नऊवारीचा रॅप तुम्ही कधी ऐकला का? हाच रॅप गायला आहे, तो या मराठी मुलीने. हे वाचा - आपल्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडलेल्या शाळकरी मुलाबद्दल माहितीयत 'या' गोष्टी? नाकात नथ आणि नऊवारी नेसून तिने नववारीचा रॅप गायला आहे. तिच्या या रॅपने सर्वांना नाचवलं आहे. या रॅपची ही झलक तुम्हीही पाहा.
काय मग मराठी मुलीचा हा रॅप ऐकून तुमचंही अंग थिरकलं की नाही... अंगात अक्षरशः संचारल्यासारखंच झालं असेल... अख्ख्या देशाला या रॅपने वेड लावणाऱ्या, आपल्या तालावर नाचवणाऱ्या या तरुणीचं नाव आहे आर्या जाधव. आर्या ही रॅप गायक आहे. ती अमरावतीची आहे. हे वाचा - प्रेम काय असतं...; महिला IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला Romantic video तुफान व्हायरल आर्या हसल 2.0 या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक आहे. हा शो रॅप गायकांसाठी आहे. या शोमध्येच तिने हा रॅप गायला. हा रॅप गायल्यानंतर परीक्षक तिचं भरभरून कौतुक करताना दिसत आहे. अमरावतीची एक मुलगी 10 जणांवर भारी अशी स्तुती तिची परीक्षकांनी केली आहे.
View this post on Instagram

A post shared by MTV India (@mtvindia)

हा रॅप ऐकताना तुम्हाला नेमकं काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
First published:

Tags: Entertainment, Viral, Viral videos

पुढील बातम्या