लग्नाच्या 17 दिवसांनंतर पळली पत्नी, करार करत पतीनंच केलं प्रियकराच्या हवाली

Viral Love Story News: पतीनेही तिला प्रियकरासोबत राहण्याची परवानगी दिली. याबद्दल पोलीस ठाण्यात एक करार करण्यात आला.

Viral Love Story News: पतीनेही तिला प्रियकरासोबत राहण्याची परवानगी दिली. याबद्दल पोलीस ठाण्यात एक करार करण्यात आला.

  • Share this:
रांची, 22 जुलै: झारखंडची (Jharkhand) राजधानी असलेल्या रांची (Ranchi) शहरातून प्रेमाचा एक वेगळाच किस्सा समोर आला आहे. लग्नाला 17 दिवस झाल्यानंतर नवी नवरी आपल्या पतीला सोडून आपल्या प्रियकराकडे पळून गेली. त्यानंतर नवऱ्या मुलाकडच्या मंडळींनी याची खबर मुलीकडच्या मंडळींना दिली. ती प्रियकराकडे (Lover) गेली असेल, अशा अंदाजाने शोध घेतला गेला, तेव्हा ती त्याच्याच घरी सापडली. त्यानंतर तिला तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींनी बरंच समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आपल्या प्रियकरासोबतच राहण्यावर अडून राहिली. यापुढची गोष्ट म्हणजे पतीनंही तिला प्रियकरासोबत राहण्याची परवानगी दिली. याबद्दल पोलीस ठाण्यात एक करार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी तिला बरंच समजावल्यावर ती पतीसोबत सासरी (In law's House) आली. मात्र तिथे तिला राहायचं नव्हतं. त्या कारणावरून ती पती आणि सासरच्या मंडळींशी दररोज भांडणं करू लागली. त्यानंतर पतीनंही तिच्यासोबत राहण्यास नकार दिला. त्यानंतर पतीच्या परवानगीने दोन्ही परिवारांनी त्या मुलीला प्रियकराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.

5 पैशांचं नाणं देऊन फ्रीमध्ये बिर्याणी खाण्याची दिली ऑफर, पण मालकाचा अंदाज चुकला आणि...

नेमकं काय आहे प्रकरण? झारखंडची राजधानी रांची शहरातल्या सुखदेवनगर (Sukhdevnagar) भागात राहणाऱ्या युवतीचं लग्न जवळच्याच चिपरा भागातल्या एका युवकासोबत (Marriage) झालं होतं. लग्न झाल्यानंतर ती आपल्या पतीपासून अंतर ठेवून राहत होती आणि 17 दिवसांनी पळूनच गेली. ती तिच्या प्रियकराच्या घरी सापडली. त्या युवतीचं लग्नाआधी एका मुलावर प्रेम (Lovestory) होतं. त्याची कल्पना तिच्या आईला होती. तरीही तिचं लग्न दुसऱ्या युवकासोबत लावून देण्यात आलं होतं. त्यामुळे लग्नानंतरही ती त्या प्रियकरासोबत कायम फोनवर बोलत असायची. संधी मिळताच ती त्याच्याकडे पळून गेली. त्या युवतीच्या प्रियकराने सांगितलं, की आमचे प्रेमसंबंध (Love Affair) दीड वर्षापासून सुरू होते. तिच्या कुटुंबीयांना याची माहिती असूनही त्यांनी तिचं लग्न दुसऱ्याशी लावून दिलं. ती पळून गेल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी ठरवलं, की तिला तिच्या प्रियकरासोबतच राहू दिलं जावं. 20 जुलै रोजी तिच्या प्रियकराला रातू प्रखंड पोलीस मुख्यालयात बोलावण्यात आलं. त्यानंतर एक करार तयार करण्यात आला. त्यानुसार पतीने (Husband) आपल्या पत्नीला (Wife) तिच्या प्रियकरासोबत राहण्याची परवानगी दिली. प्रियकरानेही या करारावर सह्या केल्या आणि आपल्या प्रेयसीला जिवापाड जपीन आणि प्रेम निभावीन असं त्याने सांगितलं.
Published by:Pooja Vichare
First published: