नवी दिल्ली, 1 मार्च : अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी देशभरातून अगदी सर्वच स्तरातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला. राम मंदिराच्या उभारणीत आपला हातभार लागावा, यासाठी देशभरातील जनतेने शक्य तितका निधी देऊ केला. गेल्या 44 दिवसांपासून निधी संकलनाचं काम सुरू आहे. (Ram temple donation campaign)
अनेक व्यावसायिकांनी कोटी रुपयांचं दान दिलं आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी सांगितलं की, शुक्रवारपर्यंत निधी संकलानाचं काम पूर्ण झाल्यानंतर 2100 कोटी रुपयांचा निधी जमा झआला आहे. यावर्षी 15 जानेवारी रोजी मंदिर उभारणीसाठी निधी संकलनासाठी अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. (his check has caught the attention of devotees)
हे ही वाचा-गलवानचा बदला घेण्यासाठी चीनचा खतरनाक प्लॅन, मुंबईतील ‘ब्लॅक आऊट’ होतं ट्रेलर
यासर्वात एक दानाची मोठी चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर मुकेश अग्रवाल नावाच्या व्यक्तीने हा फोटो शेअर केला आहे. एका दानकर्त्याने राम मंदिरासाठी 1 लाख 14 हजाप 214 रुपयांचा धनादेश दिला आहे. हा धनादेश सोशल मीडियावर रामराम म्हणून व्हायरल होत आहे. या धनादेशावर 1 लाख 14 हजार 214 रुपयांचा आकडा इंग्रजीत लिहिला आहे. हा आकडा 214214 हा असून तो देवनागरीत रामराम असा दिसत आहे. त्यामुळे दानकर्त्याच्या सर्जनशीलतेचं भारीत कौतुक केलं जात आहे.
214214/-में राम भक्त की राम राम pic.twitter.com/ju0SfG8Ik0
— मुकेश अग्रवाल (@Rashtradharam) February 28, 2021
दरम्यान राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलनाच्या शेवटच्या दिवशी बाबरी मशिदीचे फिर्यादी इकबाल अंसारी यांनीही दान दिलं आहे. हे दान त्यांनी संघ व वीएचपीच्या कार्यकर्त्यांकडे सोपवलं. यात त्यांनी त्यांचे वडील हाशिम अंसारी आणि कुटुमबीयांच्या सदस्यांची नावं लिहिली आहेत. गुप्त दानाचं कारण सांगताना ते म्हणाले की, मुस्लीम धर्मात गुप्त दान करावं, असं लिहिलं आहे. त्यामुळे त्यांनी या परंपरेचं पालन केलं. ते पुढे म्हणाले की, अयोध्येत सर्व धर्माचे लोक राहतात. राम नगरीत रामाचं मंदिर तयार होत आहे, ही आनंदाची बाब असल्याचंही ते म्हणाले.