मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मानलं भावा तुला! अवघ्या 80 रुपयांत 7 बहिणींसाठी Raksha bandhan gifts; हा जबरदस्त जुगाड एकदा पाहाच

मानलं भावा तुला! अवघ्या 80 रुपयांत 7 बहिणींसाठी Raksha bandhan gifts; हा जबरदस्त जुगाड एकदा पाहाच

रक्षाबंधनला बहिणींसाठी गिफ्टच्या बजेटचा ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

रक्षाबंधनला बहिणींसाठी गिफ्टच्या बजेटचा ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

रक्षाबंधनला बहिणींसाठी गिफ्टच्या बजेटचा ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 10 ऑगस्ट : रक्षाबंधन आलं की सर्व भावांना टेन्शन येतं ते गिफ्टचं. बहिणींना गिफ्ट काय द्यायचं हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यात बहिणी भरपूर असतील तर कित्येक भावांना आपला खिसा रिकामा होणार याचीच चिंता असते. त्यामुळे कमीत कमी किमतीत असं काय बेस्ट गिफ्ट देता येईल ज्यामुळे बहिणीही खूश होतील, याचा शोध सुरू होतो. अशाच एका कंजूस भावाने बहिणींच्या गिफ्ट्सचा जबरदस्त जुगाड केला आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. एका भावाने आपल्या बहिणींच्या गिफ्टसाठी बजेट तयार केलं आहे. फक्त 80 रुपयांत त्याने आपल्या 6 बहिणींसाठी गिफ्टची तयारी केलीच पण सोबत याच पैशात त्याने एक्स्ट्रा सातवी बहीण अचानक आली त्याचीही तरतूद करून ठेवली आहे. हे वाचा - रक्षाबंधन साजरं करायला बहीण हवी आहे! मुंबईच्या तरुणाने चक्क Dating App वर पार्टनर नव्हे बहीण शोधली व्हिडीओत पाहू शकता एका कागदावर या भावाने आपल्या  बहिणींची नावं, त्यांना दिलं जाणारं गिफ्ट्स आणि त्याची किंमत लिहिली आहे. त्यानंतर कॅल्युलेटर घेऊन त्याने त्या सर्व गिफ्ट्सची टोटल केली. तर ती फक्त 80 रुपये आहे. म्हणजे 6 बहिणींसाठी जिथे हजारो रुपये जाणार होते, तिथं फक्त शंभरच्या एका नोटेत या भावाने उरकून टाकलं. आता हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल नाही का? हे गिफ्ट असं आहे तरी काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल.
View this post on Instagram

A post shared by Be Harami (BH) (@be_harami)

या भावाने स्वतःची सख्खी बहीण, आत्याची मुलगी, काकीची मुलगी, शेजारील राहणारी काकीची मुलगी, शाळा आणि ट्युशनमधील बहीण अशा एकूण सहा बहिणींचा उल्लेख केला आहे. ज्यात काहींना त्याने कॅश आणि काहींना गिफ्ट्स म्हणून चॉकलेट दिलं आहे. यात आणखी एखादी बहीण अॅड झालीच तर तिच्यासाठीही एक चॉकलेट काढून ठेवलं आहे. हे वाचा - हौसेला मोल नाही! सोनं, डायमंड प्लॅटिनमचा साज असलेली देशातील महागडी राखी वाढवणार भावाच्या मनगटाची शोभा इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो तुफान व्हायरल होऊ लागला आहे. आता तुम्ही तुमच्या बहिणींच्या गिफ्ट्ससाठी काय जुगाड केला आहे किंवा तुमच्याकडेही रक्षाबंधनच्या गिफ्ट्ससाठी अशी काही जबरदस्त आयडिया असेल तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
First published:

Tags: Festival, Raksha bandhan, Viral, Viral videos

पुढील बातम्या