भररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण, पाहा VIDEO

भररस्त्यात होमगार्ड आणि बाईकस्वारात रंगला WWF सामाना, हेल्मेटनं केली बेदम मारहाण, पाहा VIDEO

भररस्त्यात तरुणांनी होमगार्डला हेल्मेटनं केली बेदम मारहाण, पाहा थरारक VIDEO

  • Share this:

जोधपूर, 24 सप्टेंबर : भररस्त्यात होमगार्ड आणि युवकामध्ये WWF रंगल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला होमगार्डनं अडवल्यानं बाचाबाची झाली आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. दुचाकीवर असणाऱ्या तरुणांनी होमगार्डला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली इतकच नाही तर धक्का-बुक्की करत पाण्यानं भरलेल्या ड्रममध्ये ढकलून दिलं. हा संपूर्ण प्रकार रस्त्यात सुरू होता.

उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद करत हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. जोधपूरमध्ये रस्त्यावर तरुणांनी होमगार्ड जवानांना पाण्याने भरलेल्या टबमध्ये टाकले आणि नंतर हेल्मेटने मारहाण केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचा-'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO

ही घटना जोधपूरमधील तनदा पोलीस स्टेशन परिसरातील भास्कर चौकात घडली. भास्कर चौकात वाहतूक पोलिसांकडे तैनात असलेल्या होमगार्डचा दुचाकी चालक काही तरुणांना घेऊन एका युवकाशी वाद घालून गेला. या भांडणाचं हाणामारीमध्ये रुपांतर झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या तरुणांना ताब्यात घेतलं.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 24, 2020, 3:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading