मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! महिलेच्या अंगावरच घातला JCB; समोर आला हैराण करणारा VIDEO

बापरे! महिलेच्या अंगावरच घातला JCB; समोर आला हैराण करणारा VIDEO

हा सर्व प्रकार सुरू असताना अनेक जणं फक्त पाहत उभे होते.

हा सर्व प्रकार सुरू असताना अनेक जणं फक्त पाहत उभे होते.

हा सर्व प्रकार सुरू असताना अनेक जणं फक्त पाहत उभे होते.

बाड़मेर, 19 नोव्हेंबर : भारत-पाकिस्तान बॉर्डरजवळ (India-Pakistan Border) राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेरमधील (Barmer)  एका व्हायरल व्हिडीओमुळे (Viral Video) खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये महिलेच्या अंगावर जेसीबी (JCB) चढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बाडमेर जिल्ह्यातील बायतू पोलीस ठाणे हद्दीतील हा प्रकार आहे. येथे या महिलेवर तिच्याच कुटुंबातील दोन महिला आणि काही लोक हल्ला करीत असल्याचं दिसत आहे. या घटनेटा व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बायतू मुख्यालयात भूखंड वादावरुन एका गटाने या महिलाच्या जमिनीवर जेसीबी चालवण्यात सुरुवात केली. ज्याचा विरोध केल्यानंतर दोन महिलांनी या महिलेवर हल्ला केला. हा सर्व प्रकार सुरू असताना अनेक जणं फक्त पाहत उभे होते.

हे ही वाचा-मोमोज खाताना तरुणाचं दुचाकीवरुन केलं अपहरण; पोलिसही शॉक, पाहा VIDEO

महिलेवर मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेलं नाही. तर दुसरीकडे महिलेवर हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र न्यूज 18 या व्हिडीओची पुष्टी करीत नाही.

" isDesktop="true" id="632485" >

पोलिसांकडून तपास सुरू...

या संपूर्ण घटनाक्रमाबाबत पोलिसांनी सांगितलं की, व्हायरल व्हिडीओची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. व्हिडीओबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही पक्ष नातेवाईक आहेत. दोन्ही पक्षांमध्ये प्लॉटच्या मालकी हक्कावरुन वाद सुरू आहे. पोलीस व्हायरल व्हिडीओचाही तपास करीत आहे.

First published:

Tags: Crime, Rajasthan, Shocking viral video