उज्जैन, 18 सप्टेंबर : महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला. तर काही ठिकाणी पाणी साजल्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली होती. दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबियांना याचा खूप मोठा फटका बसला आहे. दैव बलवत्तर म्हणून हे कुटुंबीय वाचलं नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.
झालं असं की पाणी वाढत असतानाही दुचाकीवरून एक कुटुंब रस्त्यावरून जात असताना अचानक तोल गेला आणि नदीच्या दिशेनं वाहात गेलं. दुचाकीवर दाम्पत्य आणि त्यांची तीन मुलं असा प्रवास करत होते. पूल ओलांडताना पाण्याचा प्रवाह वाढला आणि दुचाकी पाण्यासोबत वाहून गेली. या दुचाकीवरून जाणारे 5 जण नदीत बुडाले. मदतीसाठी ओरडत असताना तिथल्या स्थानिकांना या घटनेची माहिती मिळाली.
हे वाचा-...आणि थेट गाडीसमोर आलं 'भूत', पर्यटकांची काय झाली अवस्था पाहा VIDEO
पुलाजवळ असलेल्या रिक्षा चालकासह काही नागरिकांनी या 5 जणांना नदीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली. अंगावर काटा आणणारी ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
मध्ये प्रदेशातील उज्जैन इथे ही घटना समोर आली. क्षिप्रा नदीच्या पुलावरून जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असून वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे.
हे वाचा-अखेर सरकारला चूक उमजली, इंदू मिलच्या कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकरांना निमंत्रण
महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. येत्या 24 तासांत पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असेल तर आणि पावसाच्या हलक्या सरी पडतील.