मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - 'रडत, हात जोडत विनवणी करत होता शेवटी...'; पोलिसाने टीटीईला ट्रेनमध्येच केली बेदम मारहाण;

VIDEO - 'रडत, हात जोडत विनवणी करत होता शेवटी...'; पोलिसाने टीटीईला ट्रेनमध्येच केली बेदम मारहाण;

पोलिसाने टीटीईला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

पोलिसाने टीटीईला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

पोलिसाने टीटीईला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad
पाटणा, 07 जुलै : रेल्वे प्रवास म्हटलं की तिकिटीशिवाय प्रवास करणाऱ्या किंवा चुकीच्या सीटवर बसणाऱ्यांना भीती असते ती टीटीई तर आपल्याला पकडणार नाही ना? पण सध्या सोशल मीडियावर अशा टीटीईचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा टीटीई रडताना, हात जोडत विनवणी करताना दिसत आहे. बिहारमध्ये या टीटीईला पोलिसाने रेल्वेतच बेदम मारहाण केली आहे (GRP Police Beat Up TTE In Bihar). रेल्वे टीटीई दिनेश कुमार सिंह यांनी जीआरपी पोलीस सुनील कुमारने आपल्याला मारहाण केली असा आरोप केला आहे.  दिनेश यांची ड्युटी भागलपूर इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये (13402 डाउन)  होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सी 1 कोचच्या एसी चेअर कारमध्ये ते होते. तेव्हा जीआरपी पोलीस सुनील कुमार यांना त्यांनी सीटबाबत विचारणा केली. ही तुमची सीट आहे का? नाही तर ज्यांची सीट आहे ते आल्यानंतर तुम्ही दुसऱ्या बोगीत जा असं सांगितलं. यामुळे सुनील कुमार यांना राग आला आणि त्यांनी आपल्या साथीदारसह दिनेश यांना मारहाण केली. हे वाचा - भरधाव ट्रेनची ट्रकला धडक; रेल्वे रुळावरील भयंकर अपघाताचा LIVE VIDEO इतर प्रवाशांनी त्यांची सुटका केली. काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बिहार फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.व्हिडीओत पाहू शकता दिनेश कुमार सिंह रडताना दिसत आहे. हात जोडून विनवणी करताना दिसत आहे. इतर प्रवाशी त्यांना शांत करण्याचा, धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे वाचा - धक्कादायक! आकाशातून नवऱ्यावर कोसळली वीज; बायकोने रेकॉर्ड केला भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO दरम्यान याबाबत दिनेश यांनी सुनील यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याचीही माहिती मिळते आहे.
First published:

Tags: Bihar, Crime, Viral, Viral videos

पुढील बातम्या