मथुरा, 18 डिसेंबर: मराठीमध्ये एक म्हणं आहे 'देव तारी त्याला कोण मारी'. एखादी व्यक्ती जेव्हा जीवन-मरणाच्या दारात असते आणि अचानक असं काही तरी अद्भभुत घडतं आणि ती व्यक्ती एका क्षणात सुखरूप बचावते. अशावेळी लोकांना वाचवायला प्रत्येक वेळी देव येतं नसतो, तर देवरूपी माणसं येत असतात. यावेळी मथुरा स्टेशनवरील एक प्रवासी रेल्वेच्या रुळावर पडणार इतक्यात एक जवान देवरूपी धावून आला आणि हा अपघात टळला. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मथुरा रेल्वे स्थानकावर एक प्रवासी झेलम एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता, अचानक त्याचा तोल सुटला आणि तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये ओढला जात होता. पण रेल्वे स्थानकावर सेवा बजावणाऱ्या जवानांना हे दृश्य दिसलं, क्षणाचाही विलंब न करता एक जवान तिकडे धावून गेला आणि त्या प्रवाशाचा जीव वाचवला. हा सगळा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मथुरा रेल्वे स्थानकावर ड्युटी करत असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सतिश कुमार यांनी या प्रवाशाचा जीव वाचवला आहे. ही घटना मथुरा स्टेशनवरील फ्लॅट क्रमांक दोन वर घडली. यावेळी एक प्रवासी झेलम एक्सप्रेस रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. अचानक त्याचा पाय घसरला आणि तो रेल्वे रुळाखाली ओढला जात होता. या अचानक घडलेल्या अपघातात रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सतिश कुमार यांनी हजरजबाबीपणा दाखवला आणि धावत जाऊन या प्रवाशाचा जीव वाचवला. त्यामुळं उपस्थितांनी या जवानाचं कौतुकं केलं आहे.
या घटनेनंतर संबंधित प्रवाशाला त्यांनी सुखरूपणे झेलम एक्सप्रेस रेल्वेमध्ये बसवलं. या घटनेमुळं 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचं प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळालं.