Home /News /viral /

राफेल विमान हवेतच रिफील करू शकतं इंधन? वाचा या व्हायरल VIDEO मागचं सत्य

राफेल विमान हवेतच रिफील करू शकतं इंधन? वाचा या व्हायरल VIDEO मागचं सत्य

सुपर फायटर राफेल विमान अखेर भारताच्या हवाई क्षेत्रात दाखल झाले, मात्र हे विमान खरंच हवेत इंधन रिफील करू शकते का? वाचा सत्य.

    नवी दिल्ली, 31 जुलै: भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी खास असे सुपर फायटर राफेल विमान अखेर भारताच्या हवाई क्षेत्रात दाखल झाले आहे. 29 जुलै फ्रान्समध्ये तयार झालेल्या राफेल विमानाची एक तुकडी भारतात दाखल झाली. त्यानंतर राफेल विमानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसाच एक मिड-एअर रिफीलिंगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये राफेल विमान हवेतच इंधन भरत असल्याचे दिसत आहे. ओटीव्ही इंग्रजी या फेसबुक पेजनं हा व्हिडीओ शेअर केला, त्यानंतर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. पाच राफेल विमानांनी सोमवारी (27 जुलै) फ्रांसच्या मेरिनैक येथून उड्डाण घेतलं होतं. फ्रान्स ते भारत जवळपास 7 हजार किमीच्या प्रवासादरम्यान या पाचही लढाऊ विमानांना 28 जुलैला  संयुक्त अरब अमीरातच्या (यूएई) अल डाफरा एअरबेसवर येथे थांबा देण्यात आला होता. तिथे इंधन भरल्यानंतर हे विमान भारताच्या दिशेला रवाना झाले होते. वाचा-...आणि अचानक आकाशातून खाली पडताना दिसली उल्का, अद्भुत VIDEO VIRAL वाचा-चालकाच्या डोळ्यादेखत पडली 11 हजार वोल्टची वीजेची तार, बर्निंग ट्रकचा थरारक VIDEO राफेलच्या मिड-एअर रिफीलिंगचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची सत्यता पडताळण्यात आली. यात हा व्हिडीओ राफेल विमानाचा नसून ब्राझीलचा असल्याचे समोर आले आहे. राफेल विमानाच्या नावाने व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा असून हा ब्राझीलच्या हवाई दलाचा आहे. वाचा-चालत्या गाडीतून पडला प्रवाशी, ट्रेनखाली जाणार तेवढ्यात जवानाने वाचवले प्राण हा व्हिडीओ 2018 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता राफेलच्या नावाने या विमानाचा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. त्यामुळे असे व्हिडीओ योग्य माहिती पडताळून फॉरवर्ड करत जा. संपादन - प्रियांका गावडे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या