• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • जीव वाचवण्यासाठी ट्रेनसमोर धावू लागला जिद्दी ससा; अखेर जिंकली आयुष्याची शर्यत, भावुक करणारा VIDEO

जीव वाचवण्यासाठी ट्रेनसमोर धावू लागला जिद्दी ससा; अखेर जिंकली आयुष्याची शर्यत, भावुक करणारा VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक छोटाशा ससा ट्रेनच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर (Rabbit on Railway Track) धावताना दिसतो

 • Share this:
  नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सतत कोणता ना कोणता व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत असतो. यातील अनेक व्हिडिओ असे असतात जे आपलं मन जिंकतात तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुम्हीही थक्क व्हाल. तुम्ही हे वाक्य अनेकदा ऐकलं असेल की जेव्हा स्वतःचा जीव वाचवण्याची वेळ येते तेव्हा एखाद्या उंदरातही सिंह जागा होतो आणि तो परिस्थितीचा अगदी धाडसाने सामना करतो. असंच काहीसं सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. यात दिसतं की जेव्हा एका सशाचा जीव धोक्यात येतो तेव्हा तो अगदी जीवाच्या अकांताने प्रयत्न करून धूम ठोकतो. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक छोटाशा ससा ट्रेनच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर (Rabbit on Railway Track) धावताना दिसतो. या प्रेमळ जीवाला ट्रॅकवर पाहून आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुरू असलेला त्याचा संघर्ष पाहून ट्रेनच्या ड्रायव्हरनेही वेग थोडा कमी केला आणि हॉर्न वाजवून सशाला सावध करण्याचा प्रयत्न केला. हा ससा आपल्या जीव वाचवण्यासाठी पळत राहिला आणि अखेर त्यानं स्वतःचा बचाव केलाच. हा हैराण करणारा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल हॉग नावाच्या अकाऊंटवरुन शेअऱ केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 10 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. आपला जीव संकटात असल्याचं पाहून ससा ज्या वेगाने पळत आहे ते बघताच लोकही भावुक झाले आहेत. एका यूजरनं या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. ट्रेन ड्रायव्हरने सशाच्या या परिस्थितीची मस्करी करायला नको होती. तर दुसऱ्या एका यूजरनं ट्रेन ड्रायव्हरचं कौतुकही केलं. या यूजरनं म्हटलं की हा ड्रायव्हर ससाला चिरडून पुढेही जाऊ शकत होता. मात्र त्यानं तसं न करता ससा रस्त्यावरुन बाजूला होईपर्यंत वाट पाहिली. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: