मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ना दारू, ना D-Mart; नागरिकांनी लावलेल्या रांगेच कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

ना दारू, ना D-Mart; नागरिकांनी लावलेल्या रांगेच कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोक शहराचं कौतुक करीत आहेत.

हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोक शहराचं कौतुक करीत आहेत.

हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोक शहराचं कौतुक करीत आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 13 ऑगस्ट : लॉकडाऊनच्या (Lockdown) घोषणेपूर्वी दारूच्या दुकानासमोर मोठीच्या मोठी रांग लागल्याचं आपल्या आठवणीत असेलच. इतकच नाही तर लॉकडाऊनमध्ये जेव्हा दारूची दुकानं खुली झाली त्यानंतरही मोठी गर्दी पाहायला मिळाली. ड्राय डेच्या आधीही दुकानांबाहेर अशीच गर्दी पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तरुणांची रांग लागल्याचं दिसून येत आहे. हा फोटो कलकत्त्यातील असून ज्या कारणासाठी ही रांग आहे, ते वाचून तुम्हीही खूश व्हाल. ही रांग दारू किंवा डिमार्टच्या बाहेर नाही तर एका पुस्तकाच्या दुकानाबाहेर लागली आहे. हा फोटो पाहून एवढं नक्की की रांग फक्त दारूसाठीच नाही तर पुस्तकांसाठीदेखील लागू शकते.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो कलकत्त्यातील (kolkata news) एक प्रकाशकाच्या दुकानासमोरील आहे. हा फोटो @diptakirti नावाच्या युजरने शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हा फोटो कलकत्त्यातील असून येथे एका प्रकाशकाच्या दुकानाबाहेर लोक रांग लावून उभे आहेत. अनेक शहरात दारूसाठी रांग लागते, मात्र कलकत्त्यात पुस्तकांसाठी रांग लागते.

हे ही वाचा-ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यामुळे भारत सरकार देतंय 12 महिन्यांचा फ्री रिचार्ज?

ज्यानंतर तिने सांगितलं की, हा फोटो कलकत्त्यातील Dey’s पब्लिशिंग शॉपचा आहे. ज्यात अनेक वाचक मंडळी पुस्तकं खरेदी करण्यासाठी येतात. प्रकाशक 11 ते 15 ऑगस्टपर्यंत प्रकाशक आपल्या इन-स्टोअर कॅटलॉगवर 50 टक्के सूट देतात. ज्याला त्यांनी ‘स्वातंत्र्य दिवस बुक बाजार’ नाव दिलं आहे. ज्यासाठी लोकांनी पुस्तकं खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. सोशल मीडियावर या फोटोचं खूप कौतुक केलं जात आहे. लोक कलकत्त्यातील तरुणांचं कौतुक करीत आहे. तर अनेकांनी ऑनलाइन पुस्तक मागविण्याचं आवाहन केलं आहे.

First published:

Tags: Social media