एका अजगरानं (Python) चक्क एक कुत्र्याचं पिल्लू (Puppy) गिळलं. पण ते पचवणं काही त्याला शक्य होईना. हे पिल्लू पोटात अडकल्यामुळे अजगराची अस्वस्थता इतकी वाढली की ते अक्षरशः जमिनीवर लोळू लागलं. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे.
अजगराची घोडचूक
अजगराला कदाचित बराच काळ काही अन्न मिळालं नसावं, असा अंदाज आहे. ते इतकं भुकेलंलं होतं की जे मिळेल, ते पोटात टाकण्यासाठी उतावीळ झालं असावं, असं हा व्हिडिओ पाहून वाटतं. आपल्या पोटापेक्षा मोठा घास त्यानं गटकावला आणि त्यानंतर मग जे व्हायचं तेच झालं.
पोटदुखी आणि वेदना
हे कुत्र्याचं पिल्लू त्या अजगरानं गिळलं खरं, पण आता अवस्था अशी झाली की ते पूर्ण पचवताही येईना आणि धड बाहेरही काढता येईना. कुत्र्याचं पिल्लू अर्धवट अवस्थेत अजगराच्या पोटात अडकलं आणि अजगर अक्षरशः गडाबडा लोळायला लागलं.
हे वाचा -
VIDEO : वृद्धाला खांद्यावर उचलून घेऊन जाताना दिसला जवान; कारण ऐकून वाटेल अभिमान
स्थानिकांची गर्दी
एका खोलीत येऊन बसलेल्या या अजगराला तिथल्या नागरिकांनी सुरुवातीला एका काठीनं ढोसलून बाहेर काढलं. बाहेर काढल्यावर त्याची अवस्था सर्वांच्याच लक्षात आली. भुकेएवढं आणि पोटापुरतं खावं, असं का म्हणतात, हे या अजगराकडं बघून सगळ्यांच्याच लक्षात आलं. अर्थात, अजगराला असं ‘म्हटलेलं’ कळत नसलं, तरी अनुभवातून त्यालादेखील हे शहाणपण आलंच असावं, अशी चर्चा बघ्यांमध्ये रंगली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.