मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - भुकेल्या अजगराने जबड्यात कोंबले 2 ससे आणि एक कोंबडा; शेवटी तडफडून तडफडून...

VIDEO - भुकेल्या अजगराने जबड्यात कोंबले 2 ससे आणि एक कोंबडा; शेवटी तडफडून तडफडून...

पोल्ट्री फार्ममध्ये घुसून कोंबडा आणि सशाची शिकार करणाऱ्या अजगराचीच अवस्था भयंकर झाली.

पोल्ट्री फार्ममध्ये घुसून कोंबडा आणि सशाची शिकार करणाऱ्या अजगराचीच अवस्था भयंकर झाली.

पोल्ट्री फार्ममध्ये घुसून कोंबडा आणि सशाची शिकार करणाऱ्या अजगराचीच अवस्था भयंकर झाली.

  • Published by:  Priya Lad

रायपूर, 15 जुलै : अजगराची शिकार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. अजगर आपली शिकार अख्खीच्या अख्खी गिळतो. पण बऱ्याचदा ही शिकार त्याच्याच अंगाशी येते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका भुकेल्या अजगराने शिकारीवर चांगलाच ताव मारला. पण त्यानंतर मात्र त्याच्यावर भयंकर वेळ ओढावली. अजगराची अवस्था पाहून तुम्हीही हैराण व्हाल (Python swallow on rabbit and chicken).

अजगराच्या शिकारीचा हा व्हिडीओ धक्कादायक आहे. एक भुकेला अजगर खाण्याच्या शोधात एका पोल्ट्री फार्ममध्ये घुसला. तिथे त्याने ससा आणि कोंबड्याची शिकार केली. हारवटासारखे त्याने दोन ससे आणि एक कोंबडा आपल्या जबड्यात कोंबला. आधी त्याने बकाबका खाल्लं पण जेव्हा ससे, कोंबडा त्याच्या पोटात गेले तेव्हा मात्र तो तडफडू लागला. त्याचीच नको ती अवस्था झाली.

व्हिडीओत पाहू शकता अवाढव्य अजगर दिसतो आहे. हा अजगर दिसतो तितका अवाढव्य नाही. म्हणजे त्याने ससे, कोंबडा खाल्ल्यानंतर तो इतका फुगला आहे. काही विचार न करता त्याने प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं आणि त्याचं शरीर फुगलं. त्यानंतर तो तिथून पळण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला ते शरीरामुळे शक्यच झालं नाही.

हे वाचा - पिल्लू खड्ड्यात पडताच बेशुद्ध झाली आई, पिल्लू बाहेर येताच शुद्धीवर आली; पाहा चमत्कारिक VIDEO

रिपोर्टनुसार पोल्ट्री फार्मचा मालक तिथं आला. अजगराला पाहून तो किंचाळू लागला. त्याचा आवाज ऐकून बरेच लोक तिथं जमा झाले. त्यानंतर अजगराने आपल्याला तिथून पळता यावं म्हणून जे खाल्लं

या व्हिडीओत तो उलटी करताना दिसतो. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर तो दोन्ही ससे आणि एक कोंबडा शरीराबाहेर फेकतो. तिन्ही प्राणी मृत झाले होते पण जसेच्या तसे होते. पण यानंतर तो थांबला नाही. त्याने पुन्हा प्राण्यांची शिकार करायला सुरुवात केलं. त्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखळ झाले. त्यांनी अजगराला पकडून जंगलात सोडलं.

हे वाचा - विचित्र जीवाने सर्फिंग बोटला दिला धक्का, तरुण पाण्यात पडताच...; थरकाप उडवणारा VIDEO

@swetaguptag ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. ही घटना छत्तीसगडच्या बालोदमधील असल्याची माहिती ट्विटर पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

First published:

Tags: Python, Python snake, Snake, Snake video, Viral, Viral videos, Wild animal