मेलबर्न, 21 ऑक्टोबर : एखाद्या जनावराचा जीव वाचवला की तो सहसा हल्ला करत नाही मात्र श्वास रोखून ठेवायला लावणारा VIDEO समोर आला आहे. गाडीच्या चाकात अडकलेल्या 3 फूट लांब अजगराला एका महिलेनं वाचवलं मात्र त्याच महिलेला अजगरानं वेटोळं घालून दोन्ही पाय पकडून ठेवले आणि महिलेला जागेवरून हलताही येणं अशक्य झालं.
या महिलेनं अजगर अडकल्याची माहिती आधीच रेस्क्यू टीमकडे पोहोचवली होती. त्यामुळे वेळीच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचल्यानं या महिलेचा जीव वाचला आहे. या महिलेच्या पायाला वेटोळं घातलेल्या अजगराला रेस्क्यू टीमने सोडवलं असून महिलेची सुटका केली. हा संपूर्ण थरार पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ देखील उडाली. तर काहींनी या घटनेचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल देखील केला आहे.
हे वाचा-
मालकाचा आनंद पाहून उंटही नाचायला लागले, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO
डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार 6 ऑक्टोबर रोजी ही महिला आपल्या गॅरेजमध्ये काम करत होती. तेव्हा या महिलेला कारखाली अजगर अडकल्याचं दिसलं. तिने या अजगराला आपला जीव धोक्यात घालून वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या अजगरानं महिलेच्या दोन्ही पायांना वेटोळं घातलं. किन्सलँड पोलीस सर्व्हिस नावाच्या पेजवर याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. रेस्क्यू टीमने वेळीच दाखल होत या महिलेचे प्राण वाचवले आहेत.
याआधी काही दिवसांपूर्वी मुंबईत गाडीच्या चाकात अजगर अडकल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. या घटनेमुळे 2 तास मुंबईतील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सर्पमित्रांच्या मदतीने या अजगराला वाचवण्यात यश आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.