नवी दिल्ली 27 मार्च : अजगर हा अतिशय क्रूर प्राणी आहे. तो त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांनाही जिवंत गिळतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक अजगर एका हरणाला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे (Python Trying to Swallow Deer). याचसाठी त्याने हरणाला पकडून ठेवलेलं होतं. यादरम्यान असं काही होतं, जे पाहून तुमचाही थरकाप उडेल.
उंचावरून धाडकन जमिनीवर आपटलं मांजर; त्यानंतर जे घडलं ते पाहून नेटिझन्स थक्क; पाहा VIDEO
व्हिडिओमध्ये (Shocking Video of Python) तुम्ही पाहू शकता की, हरणाच्या एका मोठ्या अजगराने हरणाच्या भोवती विळखा घातला आहे. अजगराला या हरणाला जिवंत गिळायचं होतं. यादरम्यान एका तरुणाची नजर अजगर आणि हरणावर पडली. यानंतर हा तरुण हरणाचा जीव वाचवण्याचा विचार करतो. त्यासाठी तरुण झाडाची एक फांदी घेऊन येतो. झाडाच्या या फांदीने तरुण अजगराला मारायला सुरुवात करतो. यानंतर अजगर चिडतो आणि तरुणाकडे धावतो (Python Attack Video).
เหตุเกิดเมื่อวานนี้ ณ สวนสัตว์เปิดเขาเขียว pic.twitter.com/btHDDlDkXh
— Visit Arsaithamkul (@papakrab) May 30, 2020
व्हिडीओमध्ये दिसतं की, अजगर तरुणाच्या दिशेने येत असताना अतिशय रागात दिसत आहे. मात्र हा तरुण आधीच सावध होता. जेव्हा अजगर त्याच्याकडे येऊ लागतो तेव्हा तो बरंच दूर उभा राहतो. यानंतरही तरुणाने अजगराला मारणं सुरूच ठेवलं, त्यानंतर अखेर अजगराला हरणाला सोडून तिथून पळ काढावा लागला. जेव्हा अजगर हरणाला त्याच्या पकडीतून सोडतो तेव्हा तुम्हाला हरणाच्या वेदना जाणवतील. अजगर रागात हरणाला सोडण्यापूर्वी आपल्या सर्व शक्तीनिशी हरणाचं शरीर आवळतो.
Shocking! पुण्याच्या रस्त्यावर उभ्या उभ्या खाक झाली E-Scooter; पेटत्या स्कूटरचा VIDEO VIRAL
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेजारून जाणाऱ्या लोकांनी रेकॉर्ड केला. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ थायलंडचा असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये, हरणाचा जीव वाचवण्यासाठी युवकाने दाखवलेली हिंमत पाहून तुम्ही थक्क व्हाल. भुकेलेला अजगर हरणाला सहजासहजी सोडायला तयार नव्हता, असं व्हिडिओमध्ये दिसतं. हा व्हिडिओ थायलंडमधील ड्यूसिट प्राणीसंग्रहालयाच्या सहाय्यक संचालकाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Python snake, Shocking video viral