अजगर आणि साळींदरामध्ये जोरदार झटापट, थरारक VIDEO व्हायरल

अजगर आणि साळींदरामध्ये जोरदार झटापट, थरारक VIDEO व्हायरल

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (VIRAL VIDEO) होत आहे. यामध्ये एक खतरनाक अजगर (Python) आणि साळींदर (Porcupine) या प्राण्यांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 01 जुलै : निसर्गाची किमया अद्भुत आहे हे आपण जाणतोच. पण निसर्गातील काही चमत्कार आपल्याला पाहता येतात तर काही नाही. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेच निसर्गाचे चमत्कार बऱ्याचदा व्हायरल होत असतात. दरवेळी हे VIDEO नेटकऱ्यांना अचंबित करत असतात. एखाद्या जंगलामध्ये काही प्राण्यांचे वर्चस्व असते. त्यांच्यापासून वाचण्यासाठी इतर अनेक छोट्या छोट्या प्राण्यांना धडपड करावी लागते. काही वेळा जीव वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावावी लागते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (VIRAL VIDEO) होत आहे. यामध्ये एक खतरनाक अजगर (Python) आणि साळींदर (Porcupine) या प्राण्यांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये हा अजगर या साळींदराला आपलं भक्ष्य बनवण्याच्या विचारात आहे. जंगलातील हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुधा रमन (IFS Sudha Ramen) यांनी शेअर केला आहे. यामध्ये एका डोंगराळ भागामध्ये अजगर आणि साळींदरामध्ये लढाई पाहायला मिळते. साळींदर मोठ्या कष्टाने त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे तर अजगर त्याहून जास्त जोर लावून त्याला आपले भक्ष्य बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

(हे वाचा-VIDEO : साप, कोळी की आणि काही? सरपटणाऱ्या विचित्र प्राण्याला पाहून नेटकरी हैराण)

मात्र साळींदर त्याच्या शरीरावर असणाऱ्या लांब काट्यांमुळे स्वत:चे संरक्षण करतो. अजगर देखील त्याला जखडून टाकण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओ केवळ 11 सेकंदाचा आहे. मात्र यामध्ये पाहायला मिळते आहे ती साळींदराच्या काट्यापासून वाचण्यासाठी अजगर पळ काढतो.

First published: July 1, 2020, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading