मराठी बातम्या /बातम्या /Viral /...अन् अजगराने सिंहाच्या तोंडाचाच घेतला चावा, शिकारीच्या थराराचा Video व्हायरल

...अन् अजगराने सिंहाच्या तोंडाचाच घेतला चावा, शिकारीच्या थराराचा Video व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

वन्य प्राण्यांविषयी लोकांना कायमच आकर्षण असतं. त्याचं जीवन, त्यांचे फोटो व्हिडीओ पाहण्यासाठी लोकांची नेहमीच पसंती असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : वन्य प्राण्यांविषयी लोकांना कायमच आकर्षण असतं. त्याचं जीवन, त्यांचे फोटो व्हिडीओ पाहण्यासाठी लोकांची नेहमीच पसंती असते. इंटरनेटवर तर प्राण्यांशी संबधित अनेक फोटो व्हिडीओ फिरत असतात. जास्त करुन प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशातच आणखी एक व्हिडीओ सध्या समोर आला असून यामध्ये सिंह आणि अजगरच्या शिकारीचा थरार पहायला मिळत आहे.

सिंह, वाघ, बिबट्या किंवा इतर भयंकर प्राण्यांचे व्हिडीओ तुम्ही टीव्ही किंवा इंटरनेटवर अनेकदा पाहिले असतील, जिथे हे लोक पोट भरण्यासाठी धडपडत असतात आणि बहुतांश घटनांमध्ये ते आपल्या भक्ष्याला मारतात, पण प्रत्येक वेळी त्यांचा शिकारीचा प्रयत्न यशस्वी होईलच असं नाही. कधी कधी त्यांचाच डाव उलटा पडतो. आता हा व्हिडीओ तुम्हीच बघा जिथे जंगलाचा राजा आपल्या ताकदीच्या गर्वात अजगराचा सामना करतो आणि शेवटच्या क्षणी त्याला मैदान सोडावे लागते.

View this post on Instagram

A post shared by Wildma (@wildmaofficial)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, सिंहाचं पिल्लू अजगराच्या शिकारीसाठी येतो. तो अजगराच्या दिशेने तोंड घेऊन जात असताना अचानक अजगर सिंहाच्या तोंडावरच हल्ला करतं आणि त्याच्या तोंडाला चावा घेतो. त्यानंतर सिंह तिथून धूम ठोकतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. wildmaofficial नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ही बातमी लिहेपर्यंत ज्याला हजारो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

दरम्यान, असे शिकारीचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. जंगलाचा राजा असल्यामुळे अनेक प्राणी सिंहाला घाबरतात. मात्र काही प्राणी सिंहाशीही खंबीरपणे दोन हात करताना दिसून येतात. त्यांच्या प्रयत्नापुढे आणि धैर्यापुढे जंगलाच्या राजालाही हार मानावी लागते.

First published:

Tags: Social media, Videos viral, Viral