VIDEO : या बिबट्याला अजगर गिळणारच होता पण पाहा पुढे काय घडलं...

VIDEO : या बिबट्याला अजगर गिळणारच होता पण पाहा पुढे काय घडलं...

आफ्रिकेच्या मसाई मारा ट्रँगल रिझर्व्ह पार्कमधला एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. बिबट्या आणि अजगराच्या लढाईत नेमकं जिंकलं कोण या उत्सुकतेने सगळेच जण हा व्हिडिओ बघतायत.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : आफ्रिकेच्या मसाई मारा ट्रँगल रिझर्व्ह पार्कमधला एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. बिबट्या आणि अजगराच्या लढाईत नेमकं जिंकलं कोण या उत्सुकतेने सगळेच जण हा व्हिडिओ बघतायत. डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार हा व्हिडिओ 2 महिन्यांपूर्वीचा आहे पण तो आता व्हायरल झालाय.बिबट्या आणि अजगर हे दोन्हीही त्यांच्या अचाट ताकदीबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच या लढतीमध्ये दोघंही वरचढ ठरले.

माइक वेल्टन या वन्यजीवप्रेमी तरुणाने या लढतीचा थरार कॅमेऱ्यात चित्रित केलाय. अजगर आणि बिबट्याची ही लढत पाहून मी घाबरून गेलो होतो, असं त्यांने सांगितलं. या लढाईत साप जिंकेल, असं त्याला वाटलं होतं पण नंतर तर ही लढत आणखीनच रोमांचक झाली.अजगराने बिबट्याला विळखा घातला होता पण बिबट्याने झडप घालून अजगरावर ताबा मिळवला आणि अजगराचं डोकं उडवलं.

थरार व्हायरल

या लढतीचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर चांगलेच व्हायरल झालेत. आफ्रिकेतल्या नॅशनल पार्कमध्ये जगभरातून वन्यजीवप्रेमी जात असतात. एरव्ही टीव्ही चॅनलवर पाहायला मिळणारा हा थरार इथे लाइव्ह पाहायला मिळतो.

(हेही वाचा : 1 जानेवारीपासून बदलणार सोनं खरेदीचा नियम, सरकारने दिली मंजुरी)

=========================================================================================

First Published: Nov 20, 2019 04:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading