जालंधर, 30 जानेवारी : पंजाबच्या जालंधरमध्ये अशी घटना घडली, जे पाहून लोकांची घाबरगुंडी उडाली आहे. एका पाळीव पिटबुल कुत्र्याने 15 वर्षांच्या मुलावर हल्ला केला. व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की कुत्र्याने मुलाचा पाय धरला आहे. लोकांनी या मुलाला कुत्र्यापासून सोडवण्यासाठी काठी व दगडांचा वापर केला. मात्र तरी कुत्र्याने त्याचा पाय सोडला नाही.
कुत्रा आणि मुलामधील संघर्ष बर्याच मिनिटांपर्यंत चालला, त्यानंतर आसपासच्या जमावाने लोकांनी मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी लक्ष्य नावाचा चिमुरडा शिकवणीवरून सायकलने घरी परतत असताना ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कुत्र्याने मुलाच्या पायाचा चावा घेतला, त्यानंतर मुलाने ओरडायला सुरुवात केली. दरम्यान रस्त्यालगत असलेल्या लोकांनी मुलाच्या मदतीसाठी कुत्र्यावर काठी-दगडाने हल्ला केला.
वाचा-खोड काढणाऱ्या मुलाला हत्तीनं असा दाखवला इंगा, VIDEO VIRAL
वाचा-एका विमानासोबत 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे तरुणी, आता करणार लग्न
"कमजोर दिल वाले यह वीडियो न देखे"
पंजाब: ट्यूशन से लौट रहे बच्चे पर पिटबुल का हमला, लोग डंडे-पत्थरों से पीटते रहे, लेकिन कुत्ते ने बच्चे को नहीं छोड़ा, बच्चा गंभीर रूप से हुआ जख्मी, ये वीडियो जालंधर के माई हीरा गेट के पास पड़ते पुरिया मोहल्ला की बताई जा रही है। pic.twitter.com/ZaZrPcr3wF
— आदित्य तिवारी ( Aditya Tiwari ) (@adityatiwaree) January 28, 2020
वाचा-उंदराची हिम्मत बघा! तब्बल 24 तास थांबवलं एअर इंडियाचं विमान
वाचा-मुक्याने बोलायची मोबाईल युक्ती! शाळकरी मुलांनी TikTok VIDEO तून सांगितली आयडिया
काहींनी तर या मुलाला वाचवण्यासाठी पाणी फेकले. कुत्र्याने मुलाचा पाय जबड्याने धरल्यामुळं त्याला वाचवणे कठिण होते. अखेर कुत्र्याला बेदम मारहाण करत या चिमुरड्याची सुटका केली. मात्र मुलाचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.