चक्क सिंहाच्या तोंडातून खेचून काढलं; जंगलाचा राजा आणि झेब्रामधील थरारक VIDEO पाहून व्हाल थक्क!

चक्क सिंहाच्या तोंडातून खेचून काढलं; जंगलाचा राजा आणि झेब्रामधील थरारक VIDEO पाहून व्हाल थक्क!

झेब्रा असला म्हणून काय झालं, नाद नाही करायचा. झेब्राची बॅक किक पाहिली की शक्तीशाली प्राणीही घाबरुन जातात

  • Share this:

नवी दिल्‍ली, 28 ऑक्टोबर : सिंह जरी जंगलाचा राजा असला आणि सर्व शक्तीमान प्राणी असला तरी जंगलातील इतर प्राणीही काही कमी नाहीत. शक्तीशाली प्राण्यांमध्ये अनेकजण झेब्रा या प्राण्याचंही नाव घेतात. झेब्राची किक चांगल्या चांगल्यांना धडा शिकवू शकते. झेब्राची शक्ती दाखविणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सिंह व झेब्रामधला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही झेब्राच्या धैर्याचं कौतुक कराल. हा व्हिडीओ वनअधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका सिंहाने लहान झेब्र्याची शिकार केली होती. सिंहाच्या तोंडात शिकार असताना दुसरा एक झेब्रा आला व त्याने त्या लहान झेब्राचे प्राण वाचवले. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. झेब्राच्या मागच्या पायांनी केलेल्या किकनंतर सिंह पुढे आलाच नाही, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

वाघ आणि सिंहाचे (Viral Video) व्हिडीओही खूप पाहिले जातात आणि ते व्हायरलही खूप होतात. काही दिवसांपूर्वी नंदा यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता त्यात एक वाघ नदीतून पोहत (Tiger swimming) असताना दिसत आहे. हा व्हिडीओ लोकांना खूप पसंत केला आहे. वाघाचा हा व्हिडीओ फॉरेस्‍ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक वाघ लांब नदी पोहून पार करीत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ खूप दुर्लभ आहे. कारण वाघ सर्वसाधारणपणे कमी पाण्यातच पोहतो. वाघ अधिकरी जमिनीवरच राहणं पसंत करतो.

याशिवाय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओदेखील मोठ्या संख्येने पाहिला जात आहे.

व्हिडीओ शेअर करीत सुशांत नंदाने सांगितलं की,  एक वाघ नागरहोले टाइगर रिजर्व आणि बांदीपुर टाइगर रिजर्वदरम्यान काबिनी नदी पार करीत आहे.  त्यांचं म्हणणं आहे की, वाघ खूप चांगलं पोहतात. मोठीतली मोठी नदी ते सहजपणे पार करू शकतात.

Published by: Meenal Gangurde
First published: October 28, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या