Home /News /viral /

Optical Illusion: हे चित्र सांगेल तुमचा स्वभाव, पहिल्यांदा काय दिसलं? वाचा कसं आहे व्यक्तीमत्व

Optical Illusion: हे चित्र सांगेल तुमचा स्वभाव, पहिल्यांदा काय दिसलं? वाचा कसं आहे व्यक्तीमत्व

What Did You See First: या चित्रात दोन मासे, एक गोरिला, एक सिंह आणि एक झाड आहे. या सगळ्यामध्ये तुमच्या लक्षात आलेली पहिली गोष्ट कोणती होती? तुमच्या उत्तराच्या आधारे आम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वातील रहस्ये जाणून घेऊ या.

    मुंबई, 20 जून : ऑप्टिकल इल्युजन (Optical illusion) या प्रकारची चित्रं तुम्ही आतापर्यंत पाहिली असतील. या चित्रांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची आणखी चित्रं दडलेली असतात. साधारणपणे पहिल्यांदा पाहिल्यानंतर तुम्हाला यातील केवळ एक गोष्ट दिसून येते. मात्र, नीट निरखून पाहिल्यास तुम्हाला यात आणखी चित्रं दिसू लागतात. कधी यात झाडांमध्ये व्यक्तींचा चेहरा दिसून येतो, तर दोन व्यक्तींच्या मध्ये तिसऱ्याच (Optical illusion images) प्राण्याचा चेहरा. सध्या तुमच्यासमोर असलेल्या चित्रामध्येही झाडासोबत काही प्राणी दडलेले दिसून येतील. अशा प्रकारची चित्रं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. लोक मनोरंजनाचं साधन म्हणून या चित्रांकडे पाहतात. असं असलं, तरी या चित्रांच्या माध्यमातून लोकांच्या स्वभावाबाबतही माहिती (Optical Illusion can tell your Personality) मिळू शकते. सध्या आपल्या समोरच्या चित्राचं उदाहरण घेऊया. या चित्रात प्रथमदर्शनी तुम्हाला एक झाड दिसेल. मात्र, नीट निरखून पाहिल्यास या झाडाच्या एका बाजूला गोरिल्ला माकड, दुसऱ्या बाजूला सिंह तर खालच्या बाजूला दोन मासे दिसून येतील. सर्वांना या चित्रात पहिल्यांदा झाडच दिसेल असंही नाही. कित्येकांना अगोदर गोरिल्ला किंवा अन्य प्राणीही दिसू शकतात. तुम्हाला या चित्रात पहिल्यांदा काय दिसतं, यावरुन तुमचा स्वभाव (Guessing Personality with Optical illusion) ओळखता येतो. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सर्वांत अगोदर झाड दिसलं तर बहुतांश लोकांना या चित्रात सर्वांत आधी झाड दिसेल. तुम्हीही त्यांपैकी एक असाल, तर तुम्हाला टापटिप आणि पद्धतशीर राहणं पसंत आहे असं समजावं. यासोबतच तुमच्यात नेतृत्त्वगुण आहेत. तुम्ही कोणत्याही अडचणींवर सहज मात करू शकता हे स्वभावगुण तुमच्यात आहेत. Optical Illusion: फ्लेमिंगो पक्षांच्या फोटोत लपलीये डान्स करणारी मुलगी, तुम्हाला दिसतेय का पाहा? अगोदर सिंह दिसला तर जर या चित्रात तुम्हाला सर्वांत आधी सिंह दिसला, तर तुम्ही अगदी धैर्यवान व्यक्ती आहात. तुम्ही तुमच्या लक्ष्यावर नजर ठेवून असता, आणि इतर गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकत नाहीत. तुम्ही कोणत्या वेळी काय निर्णय घ्याल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. आधी गोरिल्ला दिसला तर जर तुम्हाला या चित्रात सर्वांत आधी गोरिल्ला माकड दिसलं, तर तुम्ही स्वतःसोबत इतरांवरही टीका करणारी व्यक्ती आहात. तुम्हाला वेळेचा अपव्यय आजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला कायम कोणत्या ना कोणत्या कामात गुंतून ठेवता ही तुमची स्वभाववैशिष्ट्यं आहेत. सर्वांत आधी मासे दिसले तर वरच्या सर्व गोष्टी सोडून, सर्वांत आधी तुम्हाला चित्रातील मासे दिसले, तर तुम्ही स्व‍च्छंदी स्वभावाची व्यक्ती आहात. जीवनाकडे तुम्ही अगदी सकारात्मक दृष्टीने पाहता. तुमच्यासाठी स्वतःपेक्षा इतर लोक जास्त महत्त्वाचे असतात असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे तुम्हाला चित्रात कोणती गोष्ट अगोदर दिसते, त्यावरून तुमचा स्वभाव ओळखला जाऊ शकतो.
    First published:

    Tags: Photo viral, Social media

    पुढील बातम्या