बाबाच्या वेशात मनोरुग्णाने केला त्रिशूळने हल्ला, रस्त्यावर तुफान राडा, LIVE VIDEO

बाबाच्या वेशात मनोरुग्णाने केला त्रिशूळने हल्ला, रस्त्यावर तुफान राडा, LIVE VIDEO

पेट्रोल पंपावर जनार्दन गंगाराम खोटे हा 55 वर्षीय मनोरुग्ण साधूच्या वेशात व हातात त्रिशूल घेऊन बसलेला होता.

  • Share this:

इम्तियाज अली, प्रतिनिधी

जळगाव, 22 सप्टेंबर : जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील एका मनोरुग्णाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर त्रिशुलने हल्ला केला.  जनार्दन गंगाराम खोटे असे या मनोरुग्नाचे नाव असून या घटनेत पेट्रोल पंपावरील कर्मचारी गजानन निकम हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर मनोरुग्ण हल्लेखोराला मात्र, जमावाने चांगलाच चोप दिला आहे.

जामनेर तालुक्यातील गाडी गाव येथे जळगाव औरंगाबाद महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर जनार्दन गंगाराम खोटे हा 55 वर्षीय मनोरुग्ण साधूच्या वेशात व हातात त्रिशूल घेऊन बसलेला होता. आता पेट्रोल पंपावरच हा मनोरुग्ण त्रिशूळ घेऊन बसलेला पाहून तिथे असलेल्या लोकांची एकच भंबेरी उडाली.

कुणीही त्याच्यासमोर जाण्यास धजावत नव्हतं. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका दुचाकी स्वारावर हा मनोरुग्ण त्रिशूल घेऊन मागे धावला. त्यामुळे भयभीत झालेल्या दुचाकी चालकाने भीतीने पेट्रोल पंपाच्या कार्यालयाकडे धाव घेतली.

तेवढ्यात कार्यालयात असलेला पेट्रोल पंपावरील कर्मचारी गजानन निकम हा समोर येतातच या मनोरुग्णाने या कर्मचाऱ्यांवर त्याने त्रिशूलने हल्ला चढवला. यात कर्मचाऱ्याला दुखापत झाली.

पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यानंतर या मनोरुग्णाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून चांगलाच चोप देत त्याचे हात-पाय बांधून पोलिसांच्या स्वाधीन केले.

Published by: sachin Salve
First published: September 22, 2020, 1:59 PM IST

ताज्या बातम्या