OLX पर बेच दे! पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यालयही काढलं विकायला; वाचा काय आहे प्रकार

OLX पर बेच दे! पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यालयही काढलं विकायला; वाचा काय आहे प्रकार

काही दिवसांपूर्वी गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य स्टॅच्यू OLX वर विकायला काढल्याची जाहिरात आली होती

  • Share this:

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म OLX वर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाची विक्री केली जात असल्याच्या पोस्ट केलेल्या जाहिरातीची सध्या देशभरात चर्चा आहे. OLX वर पोस्ट केलेल्या या जाहिरातीत वाराणसीतील पंतप्रधान कार्यालयाची किंमत तब्बल साडे सात कोटी रुपये इतकी सांगण्यात आली आहे.

ऑनलाइन प्लॅटफॉर्म OLX नुसार लक्ष्मीकांत ओझा नावाच्या व्यक्तीने ही जाहिरात पोस्ट केली आहे. ओएलएक्सवर पोस्ट केलेल्या या जाहिरातीत वाराणसीतील पंतप्रधानांच्या संसदीय कार्यालयाचे चार फोटो पोस्ट करण्यात आले आहे. ज्यामधील तीन फोटो सध्याच्या पीएमओचा तर चौथा फोटो जुना पीएमओ कार्यालयाचा आहे. याशिवाय या पोस्टमध्ये या भवनाचा स्पेस एरिया 6500 क्वेअर फूट सांगितला आहे. यासोबत दोन फ्लोअरच्या भवनात 4 बेडरुम असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र OLX वर पोस्ट केलेल्या या जाहिरातीत पंतप्रधान कार्यालयाचा चुकीचा पत्ता शेअर केला आहे. सध्या पंतप्रधानांचा हा जनसंपर्क कार्यालय जवाहर नगर एक्सटेंशन आहे. मात्र या पोस्टमध्ये कृष्ण देव नगर सांगितलं आहे.

काय म्हणाले अधिकारी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदीय कार्यालयाचे प्रभारी शिव शरण पाठक यांनी सांगितलं की, कार्यालयाच्या भवनाला विक्रीचा कोणताही विचार नाही. OLX वर केलेली पोस्ट पूर्णपणे चुकीची आहे. लक्ष्मीकांत ओझा यांचा या भवनाची काहीही संबंध नाही, असेही पाठक यांनी सांगितले. यापूर्वीसुद्धा अशा प्रकारच्या फेक जाहिराती पाहण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यूच्या विक्रीची जाहिरात ओएलएस्कवर पाहायला मिळाली होती.

Published by: Meenal Gangurde
First published: December 17, 2020, 7:08 PM IST

ताज्या बातम्या