नवी दिल्ली, 17 डिसेंबर : कोरोना काळात (coronavirus) आम आदमी पार्टीने (AAP) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Viral video) यांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पीएम मोदी मास्कशिवाय (PM Modi Without Mask) दिसत आहेत. तसेच ते एका स्टॉलवर मास्क घेण्यास नकार देताना दिसत आहेत. आता आम आदमी पक्षाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, 'मास्क लावा, मोदीजींसारखे वागू नका'. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जलद गतीने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पंतप्रधानांनी मास्क न घातल्याचा मुद्दा उचलला जात आहे. 'आप'ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, पंतप्रधान मोदी हस्तकलेच्या काही स्टॉलजवळ फिरत आहेत. तिथे त्यांच्या मागे लोक जमा होत आहेत. यावेळी पीएम मोदी एका स्टॉलवर थांबले, जेथे स्वयंसेवक त्यांना मास्क घेण्याचं आवाहन करीत होते. आम आदमी पार्टीसह अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पंतप्रधान मोदींनी मास्क न लावल्याबद्दल टीका केली आहे आणि कोरोना काळात मास्क लावण्याच्या त्यांच्याच मंत्र्याची त्यांना आठवण करुन दिली.
Wear a mask. Don't be like Modi ji. pic.twitter.com/lPxdTEdZiI
— AAP (@AamAadmiParty) December 17, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: AAP, Narendra modi