मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पेन्सिल चोरी झाल्यानं नाराज झाला चिमुकला; वर्गमित्राची तक्रार करण्यासाठी गाठलं थेट पोलीस स्टेशन, VIDEO

पेन्सिल चोरी झाल्यानं नाराज झाला चिमुकला; वर्गमित्राची तक्रार करण्यासाठी गाठलं थेट पोलीस स्टेशन, VIDEO

एका मुलाची पेन्सिल चोरी झाली. मात्र याची तक्रार शिक्षकाकडे करण्याऐवजी हा विद्यार्थी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला

एका मुलाची पेन्सिल चोरी झाली. मात्र याची तक्रार शिक्षकाकडे करण्याऐवजी हा विद्यार्थी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला

एका मुलाची पेन्सिल चोरी झाली. मात्र याची तक्रार शिक्षकाकडे करण्याऐवजी हा विद्यार्थी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 27 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत राहतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे लोकांना विचार करण्यास भाग पाडतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका लहान मुलाचा आहे. तुम्हाला आपल्या लहानपणीच्या आठवणी लक्षात असतील तर हेदेखील आठत असेल तर शाळेत काही मुलं अशीही असायची जी आपलं काही ना काही सामान चोरी करत राहायची.

यात पेन्सिल, पेन किंवा इतर लहान-मोठ्या वस्तू असायच्या. त्यावेळी तुम्ही शिक्षकांकडे याबाबत तक्रार केली असेल. मात्र सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ अतिशय वेगळा आहे. यातही एका मुलाची पेन्सिल चोरी झाली. मात्र याची तक्रार शिक्षकाकडे करण्याऐवजी हा विद्यार्थी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला (Primary School Student gone in Police Station to File Complaint Against Classmate).

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की प्राथमिक शाळेत शिकणारी काही मुलं आपल्या वर्गातील विद्यार्थ्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचतात. हा व्हिडिओ आंध्र प्रदेशत्या कुरनूल जिल्ह्यातील रेडा कडुबुरू पोलीस स्टेशनचा आहे, जिथे हे विद्यार्थी गेले. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते, की चेक्ड शर्ट घातलेला एक मुलगा दावा करत आहे, की काही दिवसांपासून त्याचा एक वर्गमित्र त्याची पेन्सिल चोरत आहे आणि यासाठी तो तक्रार करायला पोलीस ठाण्यात गेला आहे.

यादरम्यान पोलीस अधिकारी आरामात या मुलाची तक्रार ऐकतात. मात्र जेव्हा हा मुलगा पोलिसांना केस दाखल करण्यासाठी बोलतो तेव्हा पोलीस या प्रकरणावर पुन्हा विचार करण्यासाठी त्याला सांगतात. सोबतच आरोपी आणि तक्रार देणाऱ्या मुलाला समजवाण्याचा प्रयत्न करतात आणि एकमेकांना हातमिळवणी करण्यास सांगतात. हे पाहून तेथील इतर मुले हसू लागतात.

शेवटपर्यंत मात्र हा मुलगा जिद्द करत राहिला की तो तक्रार दाखल करणार. मात्र पोलिसांनी त्याला आश्वासन दिले की आरोपी आता पुन्हा असं काहीही करणार नाही. यादरम्यान पोलिसांनी आरोपी मुलालाही समजावलं. तसंच त्यांना चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला आणि दोघांमध्ये आता चांगली मैत्री निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला. हा व्हिडिओ तेलुगू भाषेत आहे. जो आंध्र प्रदेश पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे., व्हिडिओ शेअर करत पोलिसांनी लिहिलं, प्राथमिक शाळेतील मुलांनाही आंध्र प्रदेश पोलिसांवर विश्वास आहे.

First published:

Tags: Funny video, Student, Theft