Home /News /viral /

या शाळेनं हुशार विद्यार्थ्यांना दिलं अतिशय अजब बक्षीस; वाचूनच व्हाल अवाक

या शाळेनं हुशार विद्यार्थ्यांना दिलं अतिशय अजब बक्षीस; वाचूनच व्हाल अवाक

चीनच्या युनान येथे असलेल्या यिलियांग काउंटीची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. इथे शिकणाऱ्या 20 हुशार आणि मेहनती मुलांना शाळेच्या मॅनेजमेंटने बक्षीस म्हणून डुकराची पिल्लं दिली

    नवी दिल्ली 17 जानेवारी : प्रायमरी शाळांमधील मुलांचं वय अगदी कमी असतं. अशात त्यांना चांगलं काम केल्यानंतर काहीतरी उपयोगी वस्तू किंवा मेडल दिलं तर त्यांचा उत्साह आणखीच वाढतो. मात्र, चीनच्या यिलियांग काउंटी येथे लहान मुलांना चांगलं काम केल्यानंतर जे बक्षीस मिळालं, त्याबद्दल तुम्ही कधीही पाहिलं किंवा ऐकलंही नसेल. यिलियांग काउंटीच्या शियांगयांग इलिमेंट्री स्कूलमध्ये (Xiangyang Elementary School) जवळपास 20 मुलांना शाळेनं आपल्या वर्षभरातील उत्तम कामगिरीसाठी सम्मानित केलं. यात बक्षीस म्हणून त्यांना एखादं प्रशस्तिपत्र किंवा मेडल नाही तर डुकराची पिल्लं देण्यात आली. ही पिल्लं लहान मुलं आपल्या आई-वडिलांसोबत घरी घेऊन गेले. गर्लफ्रेंडच्या 'त्या' व्हिडीओने बॉयफ्रेंडला झटका, सोशल मीडियावरही चर्चा चीनच्या युनान येथे असलेल्या यिलियांग काउंटीची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. इथे शिकणाऱ्या 20 हुशार आणि मेहनती मुलांना शाळेच्या मॅनेजमेंटने बक्षीस म्हणून डुकराची पिल्लं दिली (School Gifted Piglets to Students). शाळेच्या शिक्षिका हाउ चांगलियांग यांच्या म्हणण्यानुसार, हे पिगलेट्स शंघाई शियांगवू पब्लिक वेलफेअर फंडकडून देण्यात आले आहेत. शाळेत एकूण 65 विद्यार्थी शिकतात आणि 4 शिक्षक त्यांना शिकवतात. यातील 20 हुशार मुलांना त्यांच्या अभ्यासातील चांगल्या कामगिरीसाठी बक्षीस दिलं गेलं आहे. या मुलांना बक्षीस म्हणू डुकराची पिल्लं का दिली गेली, हे जाणून घेणं रंजक आहे. चीनमध्ये सोशल मीडियावर या मुलांना गळ्यात फुलांच्या माळा घातल्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. सोबतच त्यांना पांढरे, पिवळे आणि काळ्या रंगाचे 5 ते 10 किलोग्राम वजनाची डुकराची पिल्लं देण्यात आली आहेत. शाळेतील शिक्षकांचं असं म्हणणं आहे, की ही डुकराची पिल्लं केवळ मुलांनाच नाही तर त्यांच्या घरच्यांनाही प्रोत्साहित करतात. या प्राण्यांचा लगेच फायदा मिळणार नाही, मात्र भविष्यात ते खूप उपयोगी आहेत. तब्बल 20 वर्षे महिलेच्या पोटात दुखत होते, एक्स-रे करताच समोर आले विचित्र कारण शाळेची अशी अजिबात इच्छा नाही, की मुलांनी नेहमी कोणावर तरी अवलंबून राहावं. सोशल मीडियावर काहींनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया देत म्हटलं की, या मुलांनी अगदी लहान वयात कुटुंबीयांना एक प्राणी मिळवून दिला. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत होईल.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: China, Viral news

    पुढील बातम्या