मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: भगवान कृष्णाचा हात मोडल्यानं ढसाढसा रडू लागला पुजारी; मूर्ती घेऊन रुग्णालयात पोहोचला अन्...

VIDEO: भगवान कृष्णाचा हात मोडल्यानं ढसाढसा रडू लागला पुजारी; मूर्ती घेऊन रुग्णालयात पोहोचला अन्...

भगवान श्री कृष्ण यांची मूर्ती घेऊन रुग्णालयात गेलेल्या पुजारीने डॉक्टरांना सांगितलं की श्रीकृष्णाला पडल्यामुळे दुखापत झाली आहे (Lord Krishna Hand Broken).

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : हिंदू धर्मात देवाला अतिशय महत्तव दिलं जातं. याच कारणामुळे बाळकृष्णाच्या (Lord Krishna) मूर्तीचीही घरातील सदस्याप्रमाणेच काळजी घेतली जाते. लहान बाळाप्रमाणे या देवाची काळजी घेतली जाते. देवाला सकाळी उठवण्यापासून, स्नान, भोजन आणि रात्री झोपवण्यापर्यंत संपूर्ण कामं लोक अतिशय भक्तीभावाने करतात. सध्या असाच एक कृष्ण भक्त चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ (Viral Video) पाहून सगळेच म्हणतील की भक्ती सर्वात मोठी शक्ती असते.

प्रकरण उत्तर प्रदेशातील आगरा जिल्ह्यातील आहे. इथलं एक अजब प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. भगवान श्री कृष्ण यांची मूर्ती घेऊन रुग्णालयात गेलेल्या पुजारीने डॉक्टरांना सांगितलं की श्रीकृष्णाला पडल्यामुळे दुखापत झाली आहे (Lord Krishna Hand Broken). यामुळे पुजारी इतके दुखी झाले होते की ते ढसाढसा रडू लागले. त्यांनी सर्वात आधी श्रीकृष्णाच्या मुर्तीला प्लास्टर करण्याचा प्रयत्न केला मात्र यात अपयशी ठरले. यानंतर ते मूर्ती घेऊन रुग्णालयात पोहोचले.

हे प्रकऱण पाहून रुग्णालयातील स्टाफही हैराण झाला आणि पुजाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही आणि ढसाढसा रडू लागले. बराच वेळ गोंधळ सुरू होता यानंतर अखेर डॉक्टरांनी श्रीकृष्णाच्या हाताला प्लास्टर केलं.

सोशल मीडियावरही श्री कृष्णाच्या मूर्तीसोबतचा पुजाऱ्याचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर @ourtemples_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की खरंच, अशी भक्ती पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. तर आणखी एका यूजरनं कमेंट करत लिहिलं की अखेर जिद्द आणि श्रद्धेपुढे डॉक्टरही झुकले. याशिवायही अनेकांनी या पुजाऱ्याचं कौतुक केलं आहे.

First published:

Tags: Emotional, Video Viral On Social Media