मुंबई, 18 जानेवारी : सोशल मीडियावर तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल
(pregnant woman) होतो आहे, जो पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एका प्रेग्नंट महिलेचा हा व्हिडीओ आहे. या महिलेला रस्त्यातच प्रसूती वेदना सुरू झाल्या
(pregnant woman pain on road) . रस्त्यावर ती तडफडत होती. सुदैवाने त्यावेळी तिचा नवरा तिच्यासोबत होता. तिला मदत मिळावी यासाठी तिचा नवरा धडपडत होता
(Husband seeks help for pregnant wife on road) . पण त्यावेळी जे घडलं ते पाहून सुरुवातीला तुमचा संताप होईल.
व्हिडीओत पाहू शकता एक प्रेग्नंट महिला आणि तिचा नवरा रस्त्यावरून चालत आहेत. अचानक महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू होतात. तिला इतक्या भयंकर वेदना होतात की ती उभीच राहू शकत नाही. रस्त्यातच ती बसते. जशा बायकोला कळा सुरू होतात, तेव्हा तिला मदत करण्यासाठी नवऱ्याची धडपड सुरू होते. आपल्या खिशातील मोबाईल बाहेर काढत तो फोन लावताना दिसतो. सोबतच तो रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांनाही थांबवण्याचा प्रयत्न करतो. हात जोडत त्यांच्याकडून मदत मागतो. सुरुवातीला कुणीही त्यांची मदत करण्यासाठी तयार होत नाही.
हे वाचा - कोरोना पॉझिटिव्ह आई लेकीलाही पाजतेय आणि स्वतःही पितेय आपलं Breastmilk कारण...
अखेर तो रस्त्याच्या मधोमध जातो आणि एका भरधाव गाडीसमोर रस्त्यावर आपले गुडघे टेकवून बसतो. हात जोडून मदतीसाठी विनवणी करतो. समोर त्या व्यक्तीला पाहून काळ्या रंगाची ही कार थांबते. त्या कारमधून एक व्यक्ती बाहेर येते.
प्रेग्नंट महिलेला रस्त्यावर पाहताच ती व्यक्ती तिच्या दिशेने धावते. तिचा नवरा आणि ती व्यक्ती दोघंही महिलेला उचलतात आणि कारमध्ये बसवायला नेतात. त्याचवेळी पलिकडून दुचाकीवरून जाणारी एक व्यक्तीही त्यांच्या मदतीसाठी येते.
हे वाचा - ही काय भानगड? म्हणे, 'माझं स्पर्म चोरीला गेलं', व्यक्तीची पोलिसात विचित्र तक्रार
hassbiy.ya_allah नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.