VIDEO : गावापर्यंत पोहोचली नाही रुग्णवाहिका, गर्भवतीला टोपलीत बसवून केली नदी पार

VIDEO : गावापर्यंत पोहोचली नाही रुग्णवाहिका, गर्भवतीला टोपलीत बसवून केली नदी पार

आजही अनेक ग्रामीण भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि नदीला पूर आल्यानं किंवा पक्के रस्ते नसल्यानं आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही.

  • Share this:

सरगुजा, 02 ऑगस्ट: आजही अनेक ग्रामीण भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि नदीला पूर आल्यानं किंवा पक्के रस्ते नसल्यानं आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही. त्यामुळे गर्भवती महिलांना एकतर चालत किंवा खांद्यावरून घेऊन जावं लागतं. गेल्या काही दिवसांमध्ये ही पाचवी घटना असावी गर्भवती महिलेला टोपलीत घालून खांद्यावरून घेऊन जावं लागलं.

अपुरा सेवा आणि सुविधा यांच्यामुळे छत्तीसगडमधील अनेक गावं आजही आरोग्य सेवेपासून वंचित राहिली आहेत. छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे. कडनाई गावातील महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. गावापर्यंत रुग्णवाहिका येऊ शकत नसल्यानं महिलेला टोपलीत बसवून खांद्यावरून चिखल तुडवड नदी मार्गाने या महिलेला दवाखान्यात नेण्यात आलं.

हे वाचा-आईनं शिवणकाम करून मुलासोबत केला अभ्यास, दहावीत मिळवलं घवघवीत यश

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दोन जणांनी या महिलेला टोपलीत बसवलं आहे आणि दोन्ही बाजूंनी दोरी काठीला बांधून कावडसारखं खांद्यावर उचलून नदीतून नेलं जात आहे.

आणखीन काही लोक नदी किनारी य महिलेची मदत करण्यासाठी उभी आहेत. या सर्वांनी मिळून या महिलेला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. याआधी एका महिलेला रस्ता नसल्यानं 28 किलोमीटरची पायपीट करून प्रसूतीसाठी जावं लागल्याची घटना समोर आली होती.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 2, 2020, 1:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading