लंडन 24 जानेवारी : नात्यामध्ये जेव्हा धोका मिळतो, तेव्हा त्याला सामोरे जाणं अतिशय अवघड असतं. अशात जर होणाऱ्या पतीबद्दलचं एखादं विचित्र सत्य (Weird Truth About Fiancé) समोर आलं, तर काय अवस्थी होईल, याची कल्पनाही करता येणार नाही. असंच एक प्रकरण ब्रिटनमधून समोर आलं. द सनच्या रिपोर्टनुसार, आपल्या होणाऱ्या पत्नीला अंधारात ठेवणाऱ्या व्यक्तीने आपल्या रिलेशनशिपबाबतचं सत्य ब्रिटिश डे-टाईम टीव्ही शो 'दिस मॉर्निंग'च्या फोन-इन सेक्शन डिअर डिड्रेमध्ये सांगितलं
एरिक याने डिअर डिड्रेसोबत बोलताना सांगितलं, की तो आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत राहातो. तो नेहमी कामासाठी बाहेर जात असे. यादरम्यान त्याची होणारी पत्नी गरोदर झाली. यानंतर एक दिवस एरिक कामासाठी जात असल्याचं सांगून बाहेर गेला. यावेळी त्याची ट्रिप फार मोठी नव्हती.
आयुष्यभर पुरुष म्हणून जगला 3 मुलांचा पिता; 67व्या वर्षी झाला धक्कादायक खुलासा
हा व्यक्ती जेव्हा घरी परतला तेव्हा त्याच्या होणाऱ्या पत्नीने मी तुझी बॅग उचलून ठेवते, असं म्हटलं. मात्र, एरिकने तिला बॅग न उचलू देता दुसऱ्याच गोष्टींकडे तिचं लक्ष वेधलं. एक दिवस एरिक फोनवर बोलत होता मात्र होणारी पत्नी तिथे पोहोचताच त्याने फोन कट केला. त्याचं हे वागणं होणाऱ्या पत्नीला स्वार्थी वाटलं.
अचानक त्याच्या होणाऱ्या पत्नीची नजर त्याच्या बॅगवर गेली, जी तो आपल्या वर्क ट्रिपवर घेऊन गेला होता. तिने ही बॅग उघडून पाहिली. बॅगमध्ये काही फोटो आढळले. फोटोमध्ये एरिक एका अनोळखी महिलेसोबत दिसला. यानंतर महिलेनं फोटोतील महिलेबद्दल माहिती काढण्यास सुरुवात केली. यानंतर एरिकची होणारी पत्नी या महिलेच्या घरी पोहोचली.
एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे डोंगर; अरूंद रस्त्यावर वळवू लागला कार अन्.., VIDEO
तिने या महिलेला एरिकबद्दल विचारलं. एरिकच्या होणाऱ्या पत्नीने सांगितलेलं सत्य ऐकून महिला हैराण झाली (Extramarital Affair of a Man). महिलेनं सांगितलं की ती 20 वर्षांपासून एरिकची पत्नी आहे. 20 वर्षाआधी दोघांनी लग्न केलं होतं आणि आता त्यांना एक मुलगीही आहे. इतक्यात एरिकही तिथे पोहोचला. होणारी पत्नी आणि आपल्या पत्नीला एकत्र पाहून तो हैराण झाला. आता तो मोठ्या अडचणीत सापडला आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.