Home /News /viral /

एका रात्रीत गरोदर महिलेचं जडलं 150 मुलांच्या बापावर प्रेम; वाचा अनोखी Love Story

एका रात्रीत गरोदर महिलेचं जडलं 150 मुलांच्या बापावर प्रेम; वाचा अनोखी Love Story

, प्रेमाचा संबंध मनाशी नाही मेंदूशी असतो

, प्रेमाचा संबंध मनाशी नाही मेंदूशी असतो

एली नावाच्या एका महिलेचं स्पर्म डोनरवरचं (Sperm Donor) प्रेम जडलं. एलीनं सांगितलं, की या डोनरसोबत तिची भेट ऑनलाईन पद्धतीनं झाली होती.

    नवी दिल्ली 26 जून : स्पर्म डोनेशन (Sperm Donation) ही संकल्पना विकी डोनर (Vicky Donor) या बॉलिवूड चित्रपटामुळे (Bollywood Movie) लोकांना अधिक चांगल्या पद्धतीनं माहिती झाली. ही पद्धत आजकाल बऱ्यापैकी सामान्य झाली आहे. यामध्ये मेडिकल क्लिनिकमध्ये (Medical Clinic) योग्य पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर जे पालक नैसर्गिकरित्या आई-वडील होऊ शकत नाहीत, ते इतरांच्या शुक्राणूद्वारे पालक बनू शकतात. परंतु, इंग्लंडमध्ये आता परस्पर समजुतीद्वारे पुरुषाला एका रात्रीसाठी भाड्याने घेऊन गर्भवती (Pregnant) होण्याची प्रकरणं वाढत आहेत. एली नावाच्या एका महिलेसोबतही असंच घडलं. तिचं तर या स्पर्म डोनरवरचं (Sperm Donor) प्रेम जडलं. एलीनं सांगितलं, की या डोनरसोबत तिची भेट ऑनलाईन पद्धतीनं झाली होती. दोघांनीही रेट फिक्स केले आणि नंतर एका हॉटेलच्या रुममध्ये दोघांची पहिली भेट झाली. एली आपल्या डोनरसोबत संबंध ठेवण्याच्या केवळ 10 मिनिट आधीच त्याला भेटली होती. यानंतर त्यांनी एकमेकांसोबत शारिरीक संबंध ठेवले आणि दोघंही आपल्या घरी निघून गेले. मात्र, या कॉन्ट्रॅक्टचा पहिला प्रयत्न फेल झाला आणि एली प्रेग्नंट झाली नाही. यानंतर एलीनं दुसऱ्यांदा पुन्हा या डोनरला बोलावलं आणि यावेळी त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. आता एली ऑक्टोबरमध्ये बाळाला जन्म देणार आहे. अभिनेत्रींनाही मागे टाकेल इतकी हॉट आहे ही योगा टीचर; महिन्याला कमवते 73 लाख एलीला आपल्या डोनरबाबत आधी फार काही माहिती नव्हती. मात्र, जेव्हा ती प्रेग्नंट झाली तेव्हापासून दोघांमध्ये एक कनेक्शन निर्माण झालं. विशेष बाब म्हणजे, यावेळी एली एका व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये होती. प्रेग्नंट झाल्यानंतर एलीला जाणवलं की तिच्यात आणि या डोनरमधील संबंध अधिक चांगले होत चालले आहेत. हा डोनर एक ५० वर्षांचा व्यावसायिक होता. तो प्रेग्नंट होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना मदत करत असे. आतापर्यंत त्यानं यासाठी 150 महिलांना मदत केली होती. मात्र, एलीला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. दोघांमधील हे नातं इतकं घट्ट झालं की आता ते दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. VIDEO : लग्नाच्या स्टेजवरच नातेवाईकाचं विचित्र कृत्य; नवरीनं लगावली कानशिलात यूकेमध्ये दरवर्षी हजारो मुले नो स्ट्रिंग अटॅच्ड सेक्सच्या माध्यमातून जन्माला येतात, याचा उद्देश केवळ मुलांना जन्म देणं इतकाच आहे. एका रात्रीची किंमत निश्चित केली जाते. यानंतर संबंधित महिला एकदा गर्भवती झाली की दोघांमध्ये कोणताही संपर्क राहात नाही. यूके व्यतिरिक्त गर्भधारणेची ही पद्धत इतर देशांमध्ये आता खूप लोकप्रिय होत आहे. आयव्हीएफद्वारे स्पर्म मिळविण्याकरिता खूप पैसे खर्च केले जातात, परंतु याचा सक्सेस फार कमी आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Pregnant woman, Sexual relationship, Viral news

    पुढील बातम्या