काचेचा तुकडा समजून देणार होता फेकून, तोच निघाला 9 कॅरेटचा हिरा! किंमत वाचून व्हाल शॉक

काचेचा तुकडा समजून देणार होता फेकून, तोच निघाला 9 कॅरेटचा हिरा! किंमत वाचून व्हाल शॉक

आर्कान्सा स्टेट पार्कच्या वृत्तानुसार, हिरा 48 वर्षांच्या इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 26 सप्टेंबर : कधी, कसं नशीब पलटू शकतं काही सांगता येत नाही. असाच प्रकार अमेरिकेतील एक व्यक्तीसोबत घडला. पार्कमध्ये फिरत असताना त्याला चक्क एका मौल्यवान हिरा सापडला. अमेरिकेच्या केव्हिन किनार्ड नावाच्या व्यक्तीला एक मिळालेला पार्कमध्ये एक काचेचा तुकडा मिळाला. या काचेच्या तुकड्याची तपासणी केल्यानंतर हा 9.07 कॅरेटचा हिरा असल्याचे समोर आले. आर्कान्सा स्टेट पार्कच्या वृत्तानुसार, हिरा 48 वर्षांच्या इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा आहे.

केव्हिन हा अमेरिकेचा रहिवासी असून तो व्यवसायाने बँक मॅनॅजर आहे. केव्हिननं सांगितलं की, तो आणि त्याचा मित्र होलीड मुरफ्रीसबोरो लहानपणापासूनच क्रेटर ऑफ डायमंड्स पार्कला भेट देत होते, पण 7 सप्टेंबर रोजी एक चमत्कार घडला. पार्कमध्ये फिरत असताना एका काचेचा तुकडा त्याला दिसला. काचेचा हा तुकडा पाहताच त्यानं त्याकडे दुर्लक्ष केले.

वाचा-कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तरुणाचा भन्नाट जुगाड, VIDEO पाहून व्हाल हैराण

केव्हिनने सांगितले की, तो बराच काळ पार्कच्या डिस्कव्हरी सेंटरमध्ये थांबला होता, तिथं पार्क कर्मचारी लोकांना सापडलेल्या वस्तूंची नोंदणी करत होते, मात्र केव्हिनला ही काच वाटत असल्यामुळे त्याने याची नोंद केली नाही. मात्र त्याचे सामान तपासल्यानंतर त्याला सांगण्यात आले की हा तुकडा काच नसून हिरा आहे. या हिऱ्याची किंमत 1 ते 5 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

वाचा-झूमवर सुरू होती बैठक, कॅमेऱ्यात गर्लफ्रेंडसोबत अश्लील चाळे करताना दिसले खासदार

या संदर्भात उद्यानाचे सहाय्यक अधीक्षक ड्र्यू एडमंड म्हणाले की, 20 ऑगस्ट रोजी स्ट्रॉम लोरा संशोधनासाठी ठेवण्यात आला होता. मात्र 7 सप्टेंबर रोजी केव्हिनला एक चमकणारा हिरा सापडला. बुधवारीपर्यंत डायमंड्स स्टेट पार्क येथे यंदा 246 हिरे नोंदविण्यात आले असून एकूण 59.25 कॅरेट वजनाचे हिरे नोंदविण्यात आले आहेत. सरासरी लोकांना दररोज एक किंवा दोन हिरे सापडतात.

Published by: Priyanka Gawde
First published: September 26, 2020, 6:07 PM IST
Tags: Viral

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading