मुंबई, 12 नोव्हेंबर: सोशल मीडियावर (Social Media) माणसांनी माणसांसोबत केलेले अनेक प्रॅन्क व्हिडीओ (Prank Video) तुम्ही बघितले असतील. पण थायलंडच्या एका युट्यूबरने (Youtuber) चक्क प्राण्यांसोबत प्रॅन्क केले आहेत. हा व्हिडीओ बघून तुम्हाला पोट धरून हसायला येईल. अगदी आठवड्याभरात हा व्हिडीओ सोशल मीडियावरुन जगभरात पसरला आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
6 नोव्हेंबर रोजी एंजल नागा नावाच्या एका युट्यूबरने एक व्हिडीओ शेअर केला. यात असं दाखवलं आहे की, यूट्यूबर कुत्र्याच्या आणि माकडांच्या समोर खोटा वाघ ठेवतो. आधी या खोट्या वाघावर चादर पांघरलेली असते. त्याच्या आजूबाजूला खाण्याचे पदार्थ ठेवले जातात. हे पदार्थ घेण्यासाठी प्राणी त्या खोट्या वाघाजवळ जातात आणि हळूच एक माणूस येऊन ती चादर काढून टाकतो. त्यावेळी वाघ समोर दिसल्याने प्राण्यांची घाबरगुंडी उडते. आणि ते घाबरुन पळून जातात. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यांची जीव वाचवण्यासाठीची धावपळ बघून आपण हसू आवरुच शकत नाही.
हा व्हिडीओ प्राण्यांना घाबरवण्यासाठी नाही
यूट्यूबरने या व्हिडीओच्या शेवटी एक मेसेजही दिला आहे. यूट्यूबर एंजल नागा म्हणतो, हा व्हिडीओ प्राण्यांना घाबरवण्यासाठी शूट केलेला नाही. फक्त मजेच्या दृष्टीने हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. या व्हिडीओला एका आठवड्यामध्ये 50 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. तर 86 हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. यूट्यूबवर असे अनेक प्रँक व्हिडीओ तुम्ही आजपर्यंत बघितले असतील. पण प्राण्यांसोबत केलेली अशी गंमत काही वेगळीच आहे.