मराठी बातम्या /बातम्या /Viral /आजोबांचा झाला अपघात, आठवीतल्या मुलाने बुजवले रस्त्यावरील खड्डे

आजोबांचा झाला अपघात, आठवीतल्या मुलाने बुजवले रस्त्यावरील खड्डे

आजोबांचा झाला अपघात, आठवीतल्या मुलाने बुजवले रस्त्यावरील खड्डे

आजोबांचा झाला अपघात, आठवीतल्या मुलाने बुजवले रस्त्यावरील खड्डे

काही वेळा अपघातात नागरिक गंभीर जखमीही होतात. असाच एक अपघात पुदुच्चेरीमध्ये झाला. एका वयोवृद्ध व्यक्तीच्या अपघातानंतर तिच्या नातवाने केलेली कृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. नेमकं काय घडलंय, ते सविस्तर जाणून घेऊयात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    पुदुच्चेरी,23 जानेवारी : : रस्त्यांची दुरवस्था ही एक अशी समस्या आहे जी अगदी खेड्यापासून ते शहरात राहणाऱ्या सर्वांनाच भेडसावत असते. पावसाळा आला की रस्त्यावरील खड्ड्यांची कायम चर्चा होते. पण, फक्त पावसाळाच नाही, तर संपूर्ण वर्षभर, कायमच रस्त्यांच्या दुरवस्थेचा लोकांना सामना करावा लागतो. बऱ्याचदा या खड्ड्यांमुळे अपघात होतात आणि नागरिकांना जीव गमवावे लागतात. काही वेळा अपघातात नागरिक गंभीर जखमीही होतात. असाच एक अपघात पुदुच्चेरीमध्ये झाला. एका वयोवृद्ध व्यक्तीच्या अपघातानंतर तिच्या नातवाने केलेली कृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. नेमकं काय घडलंय, ते सविस्तर जाणून घेऊयात.

    परिसरातील रस्ते खराब असल्याने एका मुलाचे आजोबा दुचाकीवरून घसरून जखमी झाले. त्यामुळे आठवीत शिकणाऱ्या मुलाने त्या रस्त्यावरील खड्डे बुजवायचं ठरवलं. जेणेकरून इतर कुणाचाही रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये. ही घटना पुदुच्चेरीमध्ये घडली आहे. या संदर्भातील बातमी समोर आल्यानंतर त्या मुलाचं कौतुक होतंय. त्याचं नाव मासिलमणी आहे. या संदर्भात ‘एनडीटीव्ही’ने वृत्त दिलंय.

    हेही वाचा- प्रसिद्ध कॉमेडियनवर आली कांदे बटाटे विकण्याची वेळ? Photo व्हायरल होताच चाहते थक्क

    मासिलमणी नावाच्या या मुलाचे आजोबा शेतकरी आहेत. ते काही दिवसांपूर्वी दुचाकीने जात होते. पण खड्ड्यात दुचाकी गेली आणि त्यामुळे ते खाली पडले. त्यांना फ्रॅक्चर झाल्याने हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. या नंतर, 13 वर्षीय मासिलमणीने आपल्या गावातील विविध ठिकाणी पडलेली वाळू, खडी आणि इतर साहित्य गोळा केलं. ते सिमेंटमध्ये मिसळलं आणि शेजारच्या विलियनूर येथील सेंधनाथममध्ये रस्त्यावरील खड्डे बुजवले.

    "माझ्या आजोबांप्रमाणे कोणालाही अपघात होऊ नयेत आणि दुखापत होऊ नये ही माझी इच्छा आहे," असं त्या मुलाने सांगितलं. त्याच्या या कृतीनंतर तिथले माजी आमदार व्यायपुरी मणिकंदन यांच्याकडून या मुलाचं कौतुक करण्यात आलं. तसंच त्यांनी त्याला एक पुस्तक भेट म्हणून दिलं.

    मुलाच्या शेजाऱ्यांनी त्याचं कौतुक करून सत्कार केला आणि त्याला शाल भेट दिली. पुदुच्चेरी-पथुकन्नू रस्त्याची गेल्या सात वर्षांपासून वाईट अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, तिथून ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे, पण प्रशासन त्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी काहीच करत नाहीये, असं गावातील एका रहिवाशाने मुलाला भेटल्यानंतर सांगितले.

    दरम्यान, आजोबांच्या अपघातानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवणाऱ्या या मुलाचं परिसरातील नागरिक खूप कौतुक करत आहेत. शिवाय माध्यमांमध्ये या संदर्भातील बातमी आल्यानंतर नेटकरीही त्याचं कौतुक करत आहेत. आजोबांना त्रास झाला तो इतरांना होऊ नये, यासाठी या मुलाने केलेली कृती चर्चेचा विषय ठरली आहे.

    First published:

    Tags: Viral news