• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • दारूच्या नशेत स्थानिकांनी पोलीस कर्मचाऱ्याला केली मारहाण; भयावह घटनेचा Video Viral

दारूच्या नशेत स्थानिकांनी पोलीस कर्मचाऱ्याला केली मारहाण; भयावह घटनेचा Video Viral

भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणीचा हा VIDEO समोर आला आहे.

 • Share this:
  गोरखपुर, 23 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) गोरखपुर (Gorakhpur) जिल्ह्यात काही तरुणांनी शनिवारी रात्री उशिरा एका पोलीस कर्मचाऱ्यांला (UP Police Constable) मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर (Video Viral On Social Media) तुफान व्हायरल होत आहे. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची सूचना मिळाल्यानंतर सीओसह ठाण्यातील पोलीसही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान आरोपींविरोधात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना चौरी चोरा भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौरी चारा पोलीस ठाणे हद्दीत सोनबरसा चौकीअंतर्गत रामपूर जवळील दारूच्या दुकानाजवळील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Policeman beaten by drunken locals Video of the horrific incident goes viral) हे ही वाचा-VIDEO:आधी पकडून ठेवलं, मग..; लग्नात मेहुण्यांनी केलेले दाजीचे हाल पाहून चक्रावाल या व्हिडीओमध्ये काही लोक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करीत असताना दिसत आहे. हा व्हिडीओ रात्री उशिराचा आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चौरी चाराचे सीओ राम कनौजिया व पोलीस ठाण्याचे प्रभारी श्याम बहादूक सिंग घटनास्थळी फोर्स दलासह पोहोचले.  
  Published by:Meenal Gangurde
  First published: