मराठी बातम्या /बातम्या /Viral /Video संचारबंदीचे नियम धाब्यावर, कुत्र्याला घेऊन दुचाकीवरून फिरणाऱ्या तरुणाला कुत्र्यासहित ठेवलं कोठडीत

Video संचारबंदीचे नियम धाब्यावर, कुत्र्याला घेऊन दुचाकीवरून फिरणाऱ्या तरुणाला कुत्र्यासहित ठेवलं कोठडीत

एक तरुण संचारबंदी लागू असताना कुत्र्याला घेऊन दुचाकीवरून फिरत होता. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्यासह कुत्र्यालाही (Dog in jail) तात्पुरत्या स्वरूपाच्या कोठडीत ठेवलं.

एक तरुण संचारबंदी लागू असताना कुत्र्याला घेऊन दुचाकीवरून फिरत होता. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्यासह कुत्र्यालाही (Dog in jail) तात्पुरत्या स्वरूपाच्या कोठडीत ठेवलं.

एक तरुण संचारबंदी लागू असताना कुत्र्याला घेऊन दुचाकीवरून फिरत होता. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्यासह कुत्र्यालाही (Dog in jail) तात्पुरत्या स्वरूपाच्या कोठडीत ठेवलं.

इंदूर, 3 जून: कोरोना महामारीचे संकट (Corona in India) गंभीर बनलेले असताना अनेकजण सरकारी नियमावलीचे पालन करण्यात कुचराई करताना दिसतात. अशाच एका प्रकारात एक तरुण संचारबंदी लागू असताना कुत्र्याला घेऊन दुचाकीवरून फिरत होता. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्यासह कुत्र्यालाही (Dog in jail) तात्पुरत्या स्वरूपाच्या कोठडीत ठेवलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देशातील विविध ठिकाणच्या नागरिकांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांविषयी बेपर्वाई असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. असा एक प्रकार इंदूरमध्ये घडला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळी-सकाळी एक तरुण आपल्या कुत्र्याला घेऊन स्वतःच्या बाईकवरून फिरायला निघाला. काही अंतर गेल्यानंतर चौकातील पोलिसांनी त्याला अडवून विनाकारण फिरण्याचं कारण विचारलं. मात्र, त्याला काही समाधानकारक उत्तर देता आलं नाही. तेव्हा पोलिसांनी तरुणाला त्याच्या कुत्र्यासहित ताब्यात घेत तात्पुरत्या स्वरूपाच्या कोठडीत ठेवलं आहे. बिचाऱ्या निरागस कुत्र्याच्या चेहऱ्यावर मात्र आपल्याला कोणत्या कारणानं कोठडीत ठेवण्यात येत आहे, ते कळत नसल्याचे भाव होते. तुकोगंज पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली.

" isDesktop="true" id="558851" >

कोरोनापासून स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर, संचारबंदीच्या नियमांचे पालन, सामाजिक अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. काहीजणांना याचे गांभीर्य नसल्याने ते सर्रासपणे याचे उल्लंघन करत आहेत. याचा इतरांनाही नाहक त्रास होतो.

हे वाचा - इन्स्पेक्टर असल्याचं सांगत हिंदू मुलींंशी करायचा लग्न; LOVE Jihad चं प्रकरण आलं समोर

दरम्यान, व्हायरल व्हिडिओवर नेटीझन्सनी फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, काही जणांनी कुत्रा ऐटबाज आणि अगदी निष्पाप भाव असल्याचं म्हटलं आहे.

First published:

Tags: Indore News, Lockdown, Madhya pradesh