मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: नवरदेवाचा हात पकडून हवेत गोळीबार; लग्नमंडपातील नवरीचा तो अवतार पाहून पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

VIDEO: नवरदेवाचा हात पकडून हवेत गोळीबार; लग्नमंडपातील नवरीचा तो अवतार पाहून पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

Bride Fired in Air: नवरदेवासोबतच नवरीही स्टेजवर हवेत गोळीबार करताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bride Fired in Air: नवरदेवासोबतच नवरीही स्टेजवर हवेत गोळीबार करताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bride Fired in Air: नवरदेवासोबतच नवरीही स्टेजवर हवेत गोळीबार करताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लखनऊ 14 डिसेंबर : लग्नसमारंभात काहीतरी हटके करण्याच्या प्रयत्नात करण्यात आलेला हवेतील गोळीबार (Firing in Wedding) अनेकदा महागात पडतो. मात्र, तरीही काही लोक याची अजिबातही चिंता करत नाहीत. सध्या उत्तर प्रदेशमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. यात नवरदेवासोबतच नवरीही स्टेजवर हवेत गोळीबार करताना दिसली (Bride Fired in Air). या घटनेचा व्हिडिओ (Shocking Wedding Video) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - VIDEO: विद्यार्थ्यांचं शिक्षकासोबत संतापजनक कृत्य, डोक्यात कचरापेटी टाकली अन्..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या तपासात असं समोर आलं आहे की हा व्हिडिओ घंटाघर कोतवाली क्षेत्रातील बँक्विट हॉलमधील आहे. घंटाघर कोतवाली क्षेत्राचे सीओ फर्स्ट स्वतंत्र सिंह यांनी सांगितलं की लग्नात करण्यात आलेल्या हवेतील गोळीबाराची माहिती मिळाली आहे. हा व्हिडिओ शुक्रवारचा असल्याचं सांगितलं जात आहे.

" isDesktop="true" id="643418" >

10 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये नवविवाहित जोडपं लग्नाच्या स्टेजवरुनच हवेत गोळीबार करताना दिसत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सर्व गोष्टी तपासून योग्या ती कारवाई केली जाईल.

हेही वाचा - झोपलेल्या प्रेयसीच्या पापण्या उघडून चोरले 18 लाख, प्रियकराची शक्कल वाचून हादराल

या व्हिडिओमध्ये दिसतं की नवविवाहित जोडपं लग्नाच्या स्टेजवर उभा आहे. यादरम्यान नवरदेव आपला हात वरती करतो. इतक्यात नवरीबाईही त्याच्या हाताला आपला हात मिळवते. यानंतर नवरदेव आणि नवरी एक-एक करून चार गोळ्या हवेत झाडतात. सध्या या घटनेतील नवरदेव आणि नवरीची ओळख सार्वजनिक केली गेली नाही.

First published:

Tags: Bridegroom, Wedding video